35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeआरोग्यत्वचेला निरोगी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी "या" पाच गोष्टी नक्की करा...!

त्वचेला निरोगी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी “या” पाच गोष्टी नक्की करा…!

हवामान खात्याने आता पावसाची शक्यता वर्तवली असली तरी त्यानंतरही वातावरणात उष्णतेच्या लाटांमुळे नागरीक शक्यतो घराबाहेर जाणे टाळत आहेत. सध्या अनेक ठिकाणी प्रचंड ऊन वाढत आहे. या ऊन्हामुळे सगळेच हैराण झाले आहेत.  आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आपण पाहणार आहोत. घराबाहेर पडताना त्वचा मॉइश्चरायझ ठेवण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता यामुळे तुमच्या त्वचेवर टॅन जमा होणार नाही तसेच यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहायला मदत होते.
फेस टोनर
ऊन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी फेस टोनर लावायला विसरू नका फेस टोनरमुळे तुमच्या चेहऱ्यावर तेज येते. फेस टोनर म्हणून तुम्ही गुलाबपाणी याचा देखील उपयोग करू शकता. यामुळे तुमच्या त्वचेला आराम मिळेल.
फेस पॅक
उन्हाळ्यात चेहरा कोरडा पडतो. अशा परिस्थितीत तुम्ही आठवड्यातून तीन वेळा फेसपॅक लावावा. फेसपॅक लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्याराला थंडावा मिळतो. चेहरा आतून थंड राहिल्यावर त्याची चमक कायम राहते.
फेस स्क्रब
आठवड्यातून एकदा फेस स्क्रब अवश्य करा. उन्हाळ्यात चेहऱ्यावरील धूळ आणि घाण काढण्यासाठी फेस स्क्रब करा. यामुळे चेहऱ्यावरील छिद्र साफ होण्यास मदत होते. यामुळे चेहरा आतून स्वच्छ होतो.
सनस्क्रीन
घराबाहेर जाताना सनस्क्रीन लावायला विसरू नका. चेहऱ्यावर मॉइश्चरायझ लावल्यानंतरच सनस्क्रीनचा वापर करा. सनस्क्रीन तुमच्या चेहऱ्याला उन्हाच्या किरणांपासुन वाचवण्यास मदत करते.

हे सुद्धा वाचा

शिवराज्याभिषेक दिन 2023 : मोदी म्हणाले, शिवरायांची प्रेरणा घेऊन अमृत काळातील पुढचा 25 वर्षांचा प्रवास करणार

रानमेवा ठरतोय ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नाचे साधन, मात्र…

Maharashtra SSC Result 2023 : दहावीचा निकाल ९३.८३ टक्के ; यंदाही परिक्षेत मुलींनीच मारली बाजी

मॉइश्चरायझर
अनेकांना उन्हाळ्यात मॉइश्चरायझरची गरज नाही असं वाटतं, पण या ऋतूमध्ये देखील तुम्ही तुमच्या स्किन टाईप प्रमाणे मॉइश्चरायझरचा वापर करा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी