31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रशिवराज्याभिषेक दिन 2023 : मोदी म्हणाले, शिवरायांची प्रेरणा घेऊन अमृत काळातील पुढचा...

शिवराज्याभिषेक दिन 2023 : मोदी म्हणाले, शिवरायांची प्रेरणा घेऊन अमृत काळातील पुढचा 25 वर्षांचा प्रवास करणार

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तिथीनुसार 350 वा राज्याभिषेक दिन राज्य शासन साजरा करत आहे. स्वराज्याची राजधानी रायगडावर मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडावर शिवरायांना अभिवादन केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडीओ संदेशाव्दारे शिवरायांचा अभिवादन करत शिवरायांच्या राज्यकारभाराला उजाळा दिला.

राज्य सरकार यंदा 350 वा राज्याभिषेक दिन भव्य स्वरुपात साजरा करत आहे. त्यानिमित्त रायगडावर मोठा सोहळा आयोजित केला आहे. तर मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरविले आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शिवरायांच्या राज्याभिषेकाला यंदा 350 वर्षे पूर्ण होत आहेत. शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन करुन मध्ययुगीन काळात अभूतपुर्व अशी क्रांती घडवून आणली होती. त्यांच्या राज्याभिषेकदिना निमित्त राज्य सरकार शिवराज्याभिषेक दिन साजरा करत आहे.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे. त्यात त्यांशी म्हटले आहे की, शिवराज्याभिषेक दिन नवी उर्जा घेऊन आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तत्कालीन काळातील एक अद्भूत आणि वैशिष्ट्यपूर्ण अध्याय आहे. राष्ट्र कल्याण आणि रयतेचे कल्याण त्यांच्या राज्य कारभाराचे मूळ तत्व होते. मी आज छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी नमन करतो.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी भारताचे एक्य आणि अखंडतेला सर्वोच्च मानले. एक भारत श्रेष्ठ भारताच्या धेय्यामध्ये शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब दिसून येते. शेकडो वर्षांच्या गुलामीने देशवासीयांचा आत्मविश्वास गळून पडला होता. अशावेळी लोकांमध्ये आत्मविश्वास निर्मान करणे मोठे कठीन काम होते. त्याकाळात शिवाजी महाराज फक्त आक्रमणकर्त्यांसोबतच लढले असे नव्हे तर त्यांनी सर्वसामान्य रयतेच्या मनात रयतेच्या राज्याचा विश्वास देखील निर्मान केला.

मोदी म्हणाले, शिवरायांचे व्यक्तीमत्व अद्भूत होते, त्यांनी स्वराज्याची स्थापना तर केलीच पण सुराज्य देखील निर्मान केले. त्यांना त्यांच्या पराक्रमामुळे आणि उत्कृष्ट राज्यकारभाराबद्दल देखील ओळखले जाते. त्यांनी राष्ट्र निर्मानाचे भव्य दिव्य स्वप्न समोर ठेवले आणि राज्यकारभाराचे लोककल्याणकारी चरित्र देखील लोकांसमोर ठेवले.

शिवरायांनी खुपच कमी वयात सिद्ध करुन दाखवले की, ते उत्कृष्ट सैन्यबळ बाळगणारे एक महान योद्धा होते. त्यांचे व्यक्तीमत्व अद्भूत होते. त्यांनी सुराज्याची संकल्पना मांडताना स्वराज्याची स्थापना देखील केली. ते त्यांच्या बुद्धीचातुर्याबद्दल देखील ओळखले जातात.

हे सुद्धा वाचा

ऋतुराज आणि उत्कर्षाच्या हातावर खुलली मेहंदी; या तारखेला होणार शुभमंगल!

Maharashtra SSC Result 2023 : दहावीचा निकाल ९३.८३ टक्के ; यंदाही परिक्षेत मुलींनीच मारली बाजी

कर्नाटकात पाणी टंचाई; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे एकनाथ शिंदेंना पत्र

पंतप्रधान मोदी यांनी शिवरायांच्या राज्यकारभार आणि कुशल नितीचा आढावा घेत सांगितले की, त्यांनी भारताच्या सामर्थ्याला ओळखून ज्या पद्धतीने आरमाराचा विस्तार केला ते आज देखील आम्हाला प्रेरणादायी आहे. आमच्या सरकारचे मोठे सौभाग्य आहे की, शिवरायांच्या प्रेरणेतून गेल्या वर्षी भारताने गुलामीच्या एका निशाणीपासून नौसेना मुक्ती दिली. इंग्रजांच्या निशाणीला हटवून त्याठीकाणी शिवाजी महाराजांची राजमुद्रा आम्ही लावली.

मोदी म्हणाले, इतक्या वर्षानंतर देखील त्यांनी रुजवलेल्या मुल्ये आम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतात. त्यां मुल्यांच्या आधारे आम्हाला अमृत काळातील 25 वर्षांचा प्रवास पूर्ण करायचा आहे. हा प्रवास शिवरायांच्या स्वप्नातील भारत घडवुण्याचा असेल. हा प्रवास असेल स्वराज्य, सुशासन आणि आत्मनिर्भरतेचा. हा प्रवास असेल विकसित भारताचा.

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी