35 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमनोरंजनचालकाची तब्बेत अचानक बिघडली अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने दाखवली जिगर

चालकाची तब्बेत अचानक बिघडली अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने दाखवली जिगर

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हे नाव मराठीसृष्टीत काही नवीन नाही. संकर्षण गेल्या अनेक वर्षांपासून नाटक आणि मालिकांमध्ये काम करत आहे.‌ त्यांने मस्त मजेदार किचन कलाकार या कार्यक्रमातून प्रक्षेकांचे मन जिंकले होते. या कार्यक्रमात प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे या दोघांची भूमिका महत्वाची ठरली आहे. सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकात संकर्षण कऱ्हाडे मुख्य भूमिकेत दिसून येत आहे. दरम्यान संकर्षण कऱ्हाडे आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे.

संकर्षणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये संकर्षण कऱ्हाडे स्वत: नाटकाची बस चालवताना दिसत आहे. हा व्हिडीओ प्रशांत दामले यांनी फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

या व्हिडीओसोबत दामलेंनी एक पोस्ट देखील लिहिली आहे ज्यात त्यांनी लिहिलंय की, “काल रात्री कोथरूडच्या प्रयोगाला आमचा चालक प्रवीण ह्याला बरं वाटेनासं झालं. साधारणपणे, प्रयोग 12:30 ला संपल्यावर आम्ही सेट भरून, जेवून पहाटे 2 वाजताच्या सुमारास मुंबईकडे निघालो. पण चालक आजारी पडला म्हटल्यावर सगळचं थांबलं. पण थांबेल तो संक्या कसला. त्याने चालकाला मागे झोपवलं आणि स्वतः ड्राइवर सीटवर बसला आणि लोणावळ्यापर्यंत बस हाणली. त्याच्याकडे हेवीचा पण लायसन्स आहे हे कालच मला कळले. लोणावळ्याला ड्राइवर ओके आणि मग संक्या मागे जाऊन झोपला. इसको बोलता हैं जिगर … नाटकाचे प्रयोग आणि बस एकाच स्पीड ने चालू आहेत,” असं प्रशांत दामले यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

नाटकातील नियमाच्या बाबतीत सदैव जागरुक असणारे निर्माते प्रशांत दामले, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि आपल्या लेखणीने विचार मांडणारे युवा लेखक आणि वेगवेगळ्या कार्यक्रमातून प्रसिद्ध झालेले संकर्षण कऱ्हाडे यांचे हे नाटक आहे. स्वत:संकर्षण कऱ्हाडे, अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद बर्वे यांच्या प्रमुख भूमिका या नाटकात आहेत. या नाटकाचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे.

हे सुद्धा वाचा

त्वचेला निरोगी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी “या” पाच गोष्टी नक्की करा…!

शिवराज्याभिषेक दिन 2023 : मोदी म्हणाले, शिवरायांची प्रेरणा घेऊन अमृत काळातील पुढचा 25 वर्षांचा प्रवास करणार

ऋतुराज आणि उत्कर्षाच्या हातावर खुलली मेहंदी; या तारखेला होणार शुभमंगल!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी