27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeआरोग्यलवकर जाग येत नाही, तर 'या' टिप्स करा फॉलो

लवकर जाग येत नाही, तर ‘या’ टिप्स करा फॉलो

रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने सकाळी लवकर उठणे (Wake up) कठीण जाते. ( Wake up Early Morning Tips)तर अनेकांना अंथरुणात लोळत पडण्याची सवय असते. त्यामुळं अंगात आळस भरल्याने उठवत नाही. लवकर उठले तरी मोबाईल पाहण्यातच सकाळची सुरूवात करणारे अनेक लोक आहेत. पूर्वीचे लोक निरोगी आणि दीर्घायुष्य जगू शकले कारण ते नियमितपणे सकाळी लवकर उठायचे(Wake up) आणि त्यांची दिनचर्या सुरू केली जायची. पण आजच्या पिढीला हे फार जड जात. हा उद्या उठतो. सोमवारपासून लवकर पाच वाजता उठतो असे अनेक आश्वासन आपण स्वतःला देत असतो. अशांसाठी काही टिप्स आपण सांगणार आहोत जेणेकरुन ते लवकर उठतील. 

रात्रीचे जेवण हलके घ्या

आपल्या वाचनात ऐकण्यात नेहमी असं येत की, हेवी नाश्ता आणि रात्रीचं जेवण हलकं घ्या. रात्रीचे हलके जेवण तुम्हाला तुमचे जेवण लवकर पचण्यास मदत करते, त्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते आणि आम्लपित्त किंवा अपचन यांसारख्या समस्या कमी होतात. रात्रीच्या जड जेवणाला पचनासाठी जास्त तास लागतात आणि त्यामुळे झोपायलाही वेळ लागतो.
तसेच काहीजण वजन करण्यामागे लागलेले असतात त्यासाठी रात्रीच्या जेवणाचा त्याग करतात. पण वजन कमी करण्यासाठी तुम्ही रात्रीचे जेवण वगळू नये. पोट रिकाम ठेवू नये. हलाक आहार घ्या. पण घ्या.

उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला होणार ‘हे’ फायदे, जाणून घ्या

दिनचर्या सेट करा

लवकर उठण्यासाठी स्वतःला का असा प्रश्न विचारा. जर तुमच्याकडे लवकर उठण्याचे ठोस कारण नसेल, तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ते शक्य होणार नाही. जर तुम्ही संरचित आणि प्रेरणादायी सकाळची दिनचर्या तयार केली तर तेच तुमचे कारण बनू शकते, तुमच्यासाठी दररोज सकाळी उठणे सोपे होईल.

सर्व गॅझेट्स लांब रहा

रात्री 8 असो वा रात्री 9, स्वतःसाठी एक वेळ सेट करा ज्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल, लॅपटॉप आणि सर्व गॅझेट्स पूर्णपणे स्वतःपासून लांब ठेवाल. असं जर तुम्ही केला तर तुम्हाला सकाळी लवकर उठण्यास मदत होईल. सकाळी लवकर उठलात तर अनेक फायदे होतात.

पांढरा की ब्राऊन… कुठला भात आहे आरोग्यासाठी चांगला? जाणून घ्या

रात्री चहा, कॉफीपासून दूर राहा

रात्रीच्या जेवणानंतरही अनेकांना चहा किंवा कॉफी प्यायला आवडते. जर तुम्हाला चांगली झोप घ्यायची असेल आणि सकाळी लवकर उठायचे असेल तर रात्रीच्या वेळी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय ताबडतोब बंद करा. यामुळं तुम्हाला झोप लागणं सोपं होईल आणि सकाळी लवकर उठणंदेखील सोपं होईल.

लाईफस्टाईल बदलते

सकाळी लवकर उठल्याने दिवसभरातील सर्व कामे वेळेवर होतात. जीवन एक नियम पाळते आणि दिनचर्या योग्य राहते. खाणे, पिणे, आंघोळ, झोपणे इत्यादी सर्व कामे योग्य वेळी होतात. तुम्ही इतर कामांसाठीही सहज नियोजन करू शकता. सकाळचा सूर्यप्रकाश घेण्याचे अनेक फायदे आहेत.

तुमचा सीलिंग फॅन किंवा कुलर आवाज करतो का? मग आजच फॉलो करा ‘या’ टिप्स

तणाव कमी होतो

सकाळी लवकर उठणे आणि व्यायाम, योगासने, ध्यान यासारखी कोणतीही सकारात्मक क्रिया केल्याने तणाव कमी होतो आणि व्यक्तीला ताजेतवाने वाटते. सकाळी सूर्योदयाची उर्जा शरीरात प्रवेश करते आणि मन संतुलित करते, ज्यामुळे तणाव कमी होतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी