31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeआरोग्यपुणे जिल्ह्यातल्या एका गावात तीन महिने गर्भधारणा न करण्याचा प्रशासनाकडून सल्ला

पुणे जिल्ह्यातल्या एका गावात तीन महिने गर्भधारणा न करण्याचा प्रशासनाकडून सल्ला

टीम लय भारी

पुणे : कोरोना पाठोपाठ आता झिका विषाणूचे संकट महाराष्ट्रावर घोंघावत आहे. महाराष्ट्रात झिका विषाणूचा पहिला रुग्ण 30 जुलै रोजी आढळला. पुणे जिल्ह्यातील बेलसर या गावामध्ये 55 वर्षीय महिलेला झिकाची लागण झाली होती (Zika virus was reported in pune district last week).

राज्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण सापडल्याने प्रशासनाकडून बेलसर गावात ठोस पावले उचलण्यात आली. या पाश्र्वभूमीवर बेलसर गावात पुढील तीन महिने कुठलीही महिला गरोदर राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.(first patient of Zika virus found in maharashtra)

‘सुप्रिया सुळेंचा संसदेत टाईमपास’

बाळासाहेब ठाकरेंचे इंदिरा गांधींना पत्र, पहाटे ४.३० वाजता शिवसेना प्रमुखांना झाली होती अटक

झिकाची लागण ही ‘ एडीस ‘ नावाचा डास चावल्यामुळे होतो. झिका विषाणूचा सर्वाधिक धोका हा गर्भवती महिलांना असतो. म्हणून ग्रामपंचायतीकडून बेलसर गावात खबरदारी घेण्यात आली आहे.

त्याचबरोबर गरोदर महिलांच्या रक्ताचे नमुने तपासून त्यांना मच्छरदाणी, गुडनाईट, ओडोमॉस अशा गोष्टींचे वाटप करण्यात आले आहे. तसेच गर्भधारणा होऊ नये म्हणून निरोधचं वाटप सुध्दा गावात करण्यात आले आहे.

Zika
कोरोना पाठोपाठ आता झिका विषाणूचे संकट महाराष्ट्रावर घोंघावत आहे.

बाळासाहेब ठाकरेंचे इंदिरा गांधींना पत्र, पहाटे ४.३० वाजता शिवसेना प्रमुखांना झाली होती अटक

Zika Virus Scare In 79 Villages of Pune District

झिका विषाणूची लक्षणे
डोके दुखणे

ताप येणे

सांधे दुःखी

अंगावर लाल चट्टे येणे

घसा खवखवणे,  यासारखी लक्षणे आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी