33 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रबाळासाहेब ठाकरेंचे इंदिरा गांधींना पत्र, पहाटे ४.३० वाजता शिवसेना प्रमुखांना झाली...

बाळासाहेब ठाकरेंचे इंदिरा गांधींना पत्र, पहाटे ४.३० वाजता शिवसेना प्रमुखांना झाली होती अटक

टीम लय भारी

मुंबई : दिनांक एक  मे रोजी महाराष्ट्राला आणि त्याचबरोबर मुंबईला स्वातंत्र्य मिळाले, परंतु बेळगाव, कारवार, धारवाड, निपाणी आणि खानापूर सहित ८६५ मराठी भाषिक गावातील सीमाभागात राहणारे मराठी भाषिक अजून गोंधळातच होते. येथील मराठी भाषिक लोकांना म्हैसूर राज्यात जाण्याची सक्ती केली होती. त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती सतत कानडी सरकारशी संवाद साधून समझोता करण्याच्या प्रयत्नात होती. महाराष्ट्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारला मराठी भाषिकांची फिकीर नव्हती (Balasaheb Thackeray tried solving belgav issue)

त्यानंतर मार्मिक वृत्तपत्रातून बेळगाव विषयावर सतत बोलले जाऊ लागले. शिवसेना हा पक्ष मुळातच मराठी बाणा जपणारा असल्यामुळे हा विषय निकालात निघेल अशी मराठी भाषिकांना आशा वाटू लागली.

विधान भवनात झाले आदिवासी संस्कृतीचे दर्शन

पीडब्ल्यूडी – महानगरपालिकेची टोलवाटोलवी, बच्चू कडूंची संघटना खवळली

बेळगावातील १० लाख मराठी भाषिक नागरिकांवर अन्याय होतो आहे पाहून तत्कालीन शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काळा दिवस पाळण्याचे आवाहन केले.

 

Balasaheb Thackeray
जेव्हा शिवसेना प्रमुखांना झाली अटक

१९६८ मध्ये मराठी समितीच्या निमंत्रणावरून बाळासाहेब  (Balasaheb Thackeray ) बेळगावला गेले असता त्यांनी तेथील जनतेला उद्देशून काही आश्वासनं दिली. तेव्हा ते म्हणाले, पुढच्या वर्षी बेळगावातील मराठी जनतेला काळा दिवस पुन्हा साजरा करावा लोहगणार नाही. जर तुटलेला सीमाभाग जोडला गेला नाही तर त्याचे भयंकर परिणाम झाल्याखेरीज राहणार नाहीत.

यानंतर मुंबईतील जनतेला आपल्या बांधवांचे हे प्रश्न समजावे म्हणून त्यांनी मुंबईतून सभा घ्यायला सुरुवात केली. त्यात ते मुंबईतील जनतेला उद्देशून बेळगाव वासियांबद्दल बोलताना म्हणत, आपली मुंबई स्वतंत्र झाली म्हणजे आपण खुश होऊ नये, आपले बांधव अजून पराधीन आहेत, कानडी सरकारच्या हातात अडकलेले आहेत.

गोपीचंद पडळकर भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत, चंद्रकांत पाटलांची घेणार जागा !

Rs 400 crore okayed for memorial of Balasaheb Thackeray

बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईमधे दिलेली भाषणे आणि शिवसैनिकांनी तापवलेल्या वातावरणामुळे बेळगावात आंदोलनाची तयारी सुरु होत होती. अखंड महाराष्ट्रासाठी मराठी जनता पेटून उठली होती. बाळासाहेबांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पत्र लिहिले होते. त्यात ते असे म्हणाले कि, हे पत्र ;लिहिण्याची वेळ माझ्यावर यावी हे माझे दुर्भाग्य. महाराष्ट्रात सीमाप्रश्न उपस्थित झाल्याने जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. केंद्राने या प्रश्नाचा विचार करून लौकरात लौकर गुंता सोडवला पाहिजे. हे प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत मुंबई बंदचे कार्यक्रम होतच राहतील. आपण जनतेला त्यांचे प्रश्न सोडवण्याची जी आश्वासने दिली आहेत त्यांची लौकर पूर्तता करावी. (Balasaheb Thackeray wrote letter ti Indira Gandhi)

बाळासाहेबांनी मराठी जनतेला दिलेला शब्द पाळला. बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तत्कालीन मुंबईचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांची गाडी अडवण्याचे ठरवले. हे आंदोलन शांतपणे होणार होते परंतु पोलिसांनी आयत्यावेळी दिलेल्या धोक्यामुळे मोरारजींनी गाडी अडवली गेली नाही आणि ती थेट आंदोलनकर्त्यांना कापत त्यांच्या अंगावरून पुढे निघून गेली. या घटनेमुळे मराठ्यांचे आधीच गरम असलेले रक्त तापले आणि रक्ताचा बदला रक्तानेंच घ्यायचा असे सेनेने ठरवले.

सर्वत्र जाळपोळ सुरु झाली आणि नुकतीच २ वर्षांची झालेली शिवसेना इतकी दंगल उभी करेल, इतकी जाळपोळ करेल असे सरकारला वाटले नाही.

७ फेब्रुवारीला दंगली मोर्चे आणि सभा मिरवणुकांना बंदी घातली गेली आणि त्याच दिवशी शिवसेनेच्या दत्ताजी साळवी आणि मनोहर जोशी याना अटक झाली. त्याचमुळे शिवसैनिकांमध्ये दंगलींना ऊत आला. य्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे पोलिसांचे पथक मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांना अटक करण्यात आली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी