31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजभारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास; असा मिळवला विजय

भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास; असा मिळवला विजय

टीम लय भारी

टोकियो :- जपानमध्ये सुरू असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. पी. व्ही. सिंधूने रविवार (ता.1) कांस्यपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून एक नवा इतिहास रचला आहे. भारतीय महिला हॉकी संघाने आज ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. महिला हॉकीमध्ये आज झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियावर 1-0 अशा फरकाने मात केली आणि ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली (History made by the Indian womens hockey team).

भारतीय महिला हॉकी संघाकडून गुरजित कौर हिने केलेला एकमेव गोल सामन्यात निर्णायक ठरला. ऑलिम्पिक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची भारतीय महिला संघाची ही पहिलीच वेळ आहे. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना बेल्जियमशी होणार आहे.

सिंधूने भारताला मिळवून दिले कांस्यपदक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास

काल भारताच्या पुरुष हॉकी संघाने ब्रिटनला पराभूत करत उपांत्य फेरीत स्थान मिळवल्यानंतर आज भारताच्या महिला संघानेही तोडीस तोड कामगिरी केली. भारतीय महिला संघाने आज स्वप्नवत कामगिरी करताना आज झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत तीन वेळच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या बलाढ्य ऑस्ट्रेलियावर जबरदस्त वर्चस्व राखले (Olympic gold medalists dominated mighty Australia).

History made by the Indian women's hockey team
भारतीय महिला हॉकी संघ

भारतीय महिला हॉकी संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. तसेच, पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यानंतर 22 व्या मिनिटाला गुरजित कौर हिने गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यांतराला भारताने ही आघाडी कायम राखली.

महाराष्ट्र हळहळला, 16 कोटीच्या इंजेक्शननंतरही चिमुकल्या वेदिकाचा आज पहाटे मृत्यू

Tokyo Olympics 2021 Day 10 Live Updates: India reach semis in women’s hockey

मध्यांतरानंतर ऑस्ट्रेलियन संघाने आक्रमणाची धार वाढवत भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण आज अभेद्य बनलेल्या भारतीय बचाव फळीने ऑस्ट्रेलियाचे सर्व हल्ले परतवून लावले. सामन्यात ऑस्ट्रेलियाला तब्बल 7 पेनल्टी कॉर्नर मिळाले मात्र त्यातील एकाही पेनल्टी कॉर्नरवर गोल होऊ शकला नाही. अखेर भारताने हा सामना 1-0 अशा फरकाने जिंकून दिमाखात उपांत्य फेरी गाठली.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये साखळीतील पहिल्या तीन सामन्यात पराभूत झालेल्या भारतीय महिला हॉकी संघाने अखेरचे दोन सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. त्यानंतर आज भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक खेळ करत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाचे पाणी पाजत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी