31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमंत्रालय7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रवीण परदेशी स्वगृही, पण नियुक्ती दुय्यम ठिकाणी

7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रवीण परदेशी स्वगृही, पण नियुक्ती दुय्यम ठिकाणी

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. परदेशात असलेले प्रवीण परदेशी आता स्वगृही परतले आहेत (IAS Praveen Pardeshi return to home). पण त्यांना दुय्यम दर्जाचे पद देण्यात आले आहे.

परदेशी यांची नियुक्ती मराठी भाषा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून करण्यात आली आहे (IAS Praveen Pardeshi posted at Marathi Bhasha Bhavan). गेले वर्षभर ते संयुक्त राष्ट्र संघात प्रतीनियुक्तीवर होते. तत्पूर्वी ते नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते.

नगरविकास विभागात ते थोडे दिवसच कार्यरत होते. नगरविकास विभागातील नियुक्ती प्रतिष्ठेची मानली जाते (IAS Praveen Pardeshi was at Urban Development department). तरीही परदेशी नाराज झाले होते. कारण त्यावेळी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून त्यांची उचलबांगडी झाली होती, व नगरविकास विभागात त्यांना आणले होते.

हे सुद्धा वाचा

IAS प्रवीण परदेशींची संयुक्त राष्ट्रांत नियुक्ती, केंद्राकडून मंजूरी

आयुक्त प्रवीण परदेशींच्या पीएच्या पत्नीकडूनही ‘वाडिया’ने उकळले महागडे शुल्क

निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या मनाचा मोठेपणा, ‘कोरोना’ संकटात सापडलेल्या गावाला दिला मदतीचा हात

Pardeshi to take up key post

‘कोरोना’ची पहिली लाट त्यावेळी मुंबईत आली होती. रूग्णांचे प्रमाण वाढतच चालले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी प्रवीण परदेशींची (IAS Praveen Pardeshi ) महापालिका आयुक्त पदावरून त्यावेळी बदली केली होती.

नाराज झालेले प्रवीण परदेशी त्यानंतर परदेशात निघून गेले. आता वर्षभरानंतर ते परतले आहेत. पण मराठी भाषा या दुय्यम विभागात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रवीण परदेशींवर देवेंद्र फडणविसांचा शिक्का

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात परदेशी हे मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते ( IAS Praveen Pardeshi was in Devendra Fadnavis’ office ). त्यामुळे त्यांच्यावर फडणवीस यांचा अद्याप शिक्का आहे.

बदली झालेल्या IAS अधिकाऱ्यांची नावे

Shri. Praveen Pardeshi, IAS (1985) has been posted as Additional Chief Secretary, Marathi Bhasha Department, Mumbai.

Shri. Ranjit Kumar, IAS (2008) Director (IT), Mantralaya, Mumbai has been posted as Joint Secretary to Chief Secretary Office, Mantralaya, Mumbai.

Shri V.P.Phad, IAS (MH:2011) CEO, ZP, Osmanabad has been posted as Member Secretary, Marathwada Statutory Development Board, Aurangabad.

Dr.Pankaj Ashiya, IAS (MH:2016) Municipal Commissioner, Bhiwandi-Nijampur Municipal Corporation, Bhiwandi has been posted as CEO, ZP, Jalgaon.

Shri Rahul Gupta, IAS (MH:2017) Assistant Collector and Project Officer, ITDP, Aheri, Gadchiroli has been posted as CEO, ZP, Osmanabad.

Shri Manuj Jindal, IAS (MH:2017) Assistant Collector, Attapali Sub Division and Project Officer, ITDP, Bhamragad, Gadchiroli has been posted as CEO, ZP, Jalna.

Smt.Mitali Sethi, IAS (MH:2017) Assistant Collector and Project Officer, ITDP, Dharni, Amaravati has been posted as CEO, ZP, Chandrapur.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी