31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमंत्रालयनशिबाने उपजिल्हाधिकारी झाले, पण दुर्दैवाने घरी गेले

नशिबाने उपजिल्हाधिकारी झाले, पण दुर्दैवाने घरी गेले

टीम लय भारी

मुंबई : गेल्या 15 वर्षांपासून सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या एका उपजिल्हाधिकाऱ्यावर घरी बसण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारने तसा आदेशच जारी केला आहे ( Deputy Collector Pravin Khade dismissed ).

प्रवीण खाडे असे या उपजिल्हाधिकाऱ्याचे नाव आहे. सन 2006 मध्ये ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’मार्फत त्यांची प्रोबेशनरी उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली होती ( Pravin Khade selected as a Deputy Collector in 2006 ).

हे सुद्धा वाचा

7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रवीण परदेशी स्वगृही, पण नियुक्ती दुय्यम ठिकाणी

IAS प्राजक्ता लवंगारे यांची बदली, उद्धव ठाकरे यांनी दिले मानाचे पद

निवड झाल्यानंतर त्यांना महसूल खात्याची परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य होते. पण तीन संधी मिळूनही ते ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. त्यांना शेवटची संधी सन 2009 मध्ये मिळाली होती.

महसूल व सामान्य प्रशासन विभागाच्या विविध नियमावलींनुसार परीविक्षाधीन उपजिल्हाधिकाऱ्याने विहीत कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण केली नाही, तर संबंधित उमेदवाराची सेवा समाप्त करण्याची तरतूद आहे. त्यानुसार प्रवीण खाडे यांची सेवा समाप्त करण्याचा आदेश महसूल विभागाने जारी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी