33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला ‘कोरोना’ची लागण, महिला खासदारही ‘कोरोना’बाधित

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला ‘कोरोना’ची लागण, महिला खासदारही ‘कोरोना’बाधित

टीम लय भारी

मुंबई :  ‘महाविकास आघाडी’ सरकारमधील महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे ( Abdul Sattar tested corona positive ). त्यामुळे ‘कोरोना’ची लागण झालेले सत्तार हे पाचवे मंत्री ठरले आहेत.

Advt
जाहिरात

सत्तार यांनी मंगळवारी रात्री उशिरा एक ट्विट केले आहे. ‘कोरोना’ची लागण झाली असल्याचे त्यांनी त्या ट्विटमध्ये नमूद केले आहे ( Abdul Sattar is a fifth minister, who has tested corona Positive ) . ‘कोरोना’च्या आपत्ती काळात लोकांसाठी अनेक ठिकाणी मदतकार्य केले होते. त्यामुळे चुकून कुठेतरी संसर्ग झाला असावा, अशी शक्यता सत्तार यांनी या ट्विटद्वारे व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

आणखी एका मंत्र्यांना ‘कोरोना’ची लागण

BREAKING : ‘कोरोना’ग्रस्त मंत्र्यांना मुंबईत हलविण्याची शक्यता, सचिव सुद्धा झाले ‘कॉरन्टाईन’

Coronavirus : मंत्री अशोक चव्हाणांच्या घरालगतच्या भागात कोरोनाचे १० रूग्ण!

औरंगाबाद जिल्ह्यात ६ हजार ३०० जणांची कोरोनावर मात!

थोडी शंका आली म्हणून ‘कोरोना’ तपासणी केली. पण दुर्दैवाने अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. पण घाबरण्याचे कारण नाही. मी लवकर बरा होईन असा आत्मविश्वासही सत्तार यांनी या ट्विटद्वारे व्यक्त केला आहे. सत्तार यांच्यावर मुंबईत लिलावती रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत ( Abdul Sattar admitted in Lilavati hospital for corona treatment ).

advt
जाहिरात

यापूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख या चार मंत्र्यांना ‘कोरोना’ची लागण झाली होती. यापैकी आव्हाड, चव्हाण व मुंडे ‘कोरोना’तून बरे होऊन पुन्हा कामांत सक्रीय झाले आहेत.

अस्लम शेख यांना दोनच दिवसांपूर्वी ‘कोरोना’ची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नीलाही गेल्या आठवड्यात ‘कोरोना’ची लागण झाली आहे. त्यांच्यावरही अद्याप उपचार सुरू आहेत.

advt
जाहिरात

माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनाही ‘कोरोना’ची लागण झाली होती. ते सुद्धा पूर्णत: बरे झाले आहेत.

दरम्यान, राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांनाही ‘कोरोना’ची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत सहा आमदारांनाही ‘कोरोना’ची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी