28 C
Mumbai
Tuesday, June 18, 2024
Homeमहाराष्ट्रCoronavirus : मंत्री अशोक चव्हाणांच्या घरालगतच्या भागात कोरोनाचे १० रूग्ण!

Coronavirus : मंत्री अशोक चव्हाणांच्या घरालगतच्या भागात कोरोनाचे १० रूग्ण!

टीम लय भारी

नांदेड : राज्याचे बांधकाममंत्री अशोक चव्हाण मुंबईत उपचार घेऊन कोरोनामुक्त (Coronavirus) झाले. पण इकडे नांदेडमधील त्यांच्या निवासस्थानालगत असलेल्या नई आबादी भागात दोन दिवसांत १० कोरोना रुग्ण आढळल्याने शिवाजीनगर प्रभागात चिंता वाढली आहे.

दरम्यान, नांदेड शहराच्या वेगवेगळ्या भागांत कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झालेले असतानाच ग्रामीण भागातूनही संशयित रुग्णांचे अहवाल सकारात्मक येत आहेत. शहराच्या नई आबादी भागात गुरुवारी ५ रुग्ण सापडले. त्यापाठोपाठ शुक्रवारीही त्यात ५ जणांची भर पडली. माहूरलाही एक रुग्ण आढळला त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १८९ वर गेली आहे. गेल्या बुधवारी नांदेडमध्ये २३ जणांना कोरोनासंसर्ग झाल्यामुळे प्रशासन हादरले होते. त्यानंतरच्या दोन दिवसांत १४ नवे रुग्ण समोर आले आहेत. काल आढळून आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये चार पुरूष व तीन महिलांचा समावेश असून ते १३ ते ५० वयोगटातील असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातील पालाईगुडा येथे मुंबईहून आलेल्या पुरुषाची चाचणी केल्यानंतर या चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्याचे सांगण्यात आले. बेस्टमध्ये वाहक असलेल्या या पुरुषासोबत पत्नी व दोन मुलेही आपल्या गावी आली होती. आल्यानंतर त्यांनी प्राथमिक केंद्रात हजर होऊ न तपासणी केली तेव्हा कुठलेही लक्षण आढळले नाही. मात्र ३ जून रोजी या कर्मचा-यास सर्दीसह श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली असता ते कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. या कर्मचा-याच्या पत्नी व मुलांनाही कोविड केअर सेंटरमध्ये आणले जाणार असल्याचे ग्रामीण रुग्णालयातून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील कोरोनाचे शंभर रुग्ण झाल्यानंतर प्रशासनाने वेगवेगळे उपाय योजले असल्याचे संबंधित उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले. दरम्यान नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण गुरुवारी कोरोनामुक्त होऊन मुंबईतील आपल्या घरी दाखल झाले. त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे काँग्रेसचे आमदार अमरनाथ राजूरकर यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी