30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeराजकीयअब्दुल सत्तारांचा रावसाहेब दानवेंना धक्का, सोयगावचा गड सेनेने राखला

अब्दुल सत्तारांचा रावसाहेब दानवेंना धक्का, सोयगावचा गड सेनेने राखला

टीम लय भारी

औरंगाबाद: औरंगाबादच्या सोयगाव नगरपंचायतीत (Soygaon Municipal Council Election) ११ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने गड राखला आहे. तर भाजपला सहा जागांवर विजय मिळाला आहे. सोयगाव नगरपंचायत निवडणूक केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रतिष्ठेची बनवली होती. यामध्ये एकूण १७ जागांपैकी ११ जागेवर विजय मिळवून अब्दुल सत्तार यांनी बाजी मारून सोयगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवला आहे.( Abdul Sattar’s push to Raosaheb Danve Soygaon’s Gad Sena retained)

सोयगाव नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी चार जागांसाठीचे मतदान काल, मंगळवारी झाले होते. त्यापूर्वी पहिल्या टप्प्यात १३ जागांवर २१ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. आज, बुधवारी सोयगाव नगपंचायतीसाठी मतमोजणी पार पडली.

हे सुद्धा वाचा

Shiv Sena attack on BJP : एकदा तुमचे संस्कार, संस्कृती चव्हाटय़ावर येऊ द्या; शिवसेनेचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

काही उद्योजकांची संपत्ती कमालीची वाढली, असा हा विचित्र विरोधाभास : शिवसेना

रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या भाजप पदाधिकारी जितेन गजारियाला अटक

Shiv Sena’s ‘lagbhag mana’ moment as Congress subs alliance partner in Goa Assembly elections

मजमोजणीनुसार ११ जागांवर शिवसेनेने विजय मिळवून ६ जागांवर विजय भाजपने मिळवला आहे. यामुळे सोयगाव नगरपंचायतीचा गड अधिक मत मिळवून शिवसेनेने राखला आहे. त्यामुळे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना मोठा धक्का बसला आहे.

 वर्षभरापासून या निवडणुकीची असलेली प्रतिक्षा अखेर आज संपली आहे. पण ही निवडणुक होताच सोयगावात आता नगराध्यक्ष पदाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. यासाठी भाजप आणि शिवसेनाच अग्रेसर आहे.

त्यामुळे नराध्यक्षपदासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच सारीपाट रंगणार आहे. सोयगाव नगरपंचायत निवडणूक जिंकल्यानंतर औरंगाबाद महापालिकेत शिवसेना स्वबळावर लढणार आहे, असे अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी