27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रठाण्यात बेकायदा होर्डिंग्ज वाल्यांची आता खैर नाही, जीवितहानी झाल्यास मालकावर गुन्हा

ठाण्यात बेकायदा होर्डिंग्ज वाल्यांची आता खैर नाही, जीवितहानी झाल्यास मालकावर गुन्हा

काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. तसेच बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणामदेखील काही प्रमाणात दिसून येत आहे. अशातच वादळी वाऱ्यांमुळे बहुतांश ठिकाण झाडे आणि होर्डिंग्ज पडण्याच्या घटना घडतात. मात्र आता याकडे सरकारने लक्ष घातले आहे. यात जीवित किंवा वित्त हानी होऊन नुकसान होणार नाही या दृष्टीने शहरातील सर्व होर्डिंग्ज आणि होर्डिंग्ज टॉवरचे स्ट्रक्चर ऑडिट करावे. तसेच शहरातील अनधिकृत मेटल स्ट्रक्चर निष्कसित करावीत, शहरातील होर्डिंग्ज पडून जर दुर्घटना घडली तर संबंधित होर्डिंग्ज कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. शहरातील अनधिकृत होर्डिंग तात्काळ हटविणे आणि रस्त्यांच्याकडेला असलेल्या व इतर ठिकाणच्या धोकादायक झाडांच्या फांद्यांच्या छाटणीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत दिले आहे.

शहरातील स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी दिला आहे. जर कोणतेही दुर्घटना घडली असून त्यात मृत्यू झाल्यास कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जातो. स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल १५ दिवसांत सादर केला नाही तर एक वर्षाची परवानगी रद्द केली जाते. असे आयुक्त बांगर यांनी सांगितले आहे. सेच परवाना विभागाने शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्जचा शोध घेवून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट न करता सदरची होर्डिंग्ज तात्काळ हटविण्याची कार्यवाही करावी.

हे सुध्दा वाचा:

मुंबई,ठाण्यासह कोकणात पावसाच्या सरी कोसळल्या;विदर्भात पावसाची प्रतिक्षा कायम

येवा टोल आपलोच असा , ओसरगावमधील टोलनाक्यावरुन वाद, नेमकं काय आहे प्रकरण

चंद्रकांत पाटलांचे मोठे पाऊल, महाविद्यालातून मिळणार शेअर बाजाराचे प्रशिक्षण !

शहरात धोकादायक झाडांचा सर्व्हे करण्यात यामुळे कोणतेही हानी होणार नाही याची काळजी घ्यावी. पावसाच्या वेळी ज्या ठिकाणी झाड पडेल त्या ठिकाणाचा रस्ता अग्निशामक दलाला बोलवून मोकळा करावा. खाजगी हद्दीतील झाडांच्या फांद्याच्या छाटणीचे दर निश्चित करुन घ्यायचा. ठेकेदारामार्फत जास्त पैशांची आकारणी होत असेल तर त्याला काळ्या यादीत नाव टाकावे. पावसाळ्यांमध्ये शहरात अग्निशामक दलाने कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोहचणे गरजेचे आहे. या दलाने सर्तक राहणे गरजेचे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी