26 C
Mumbai
Saturday, December 2, 2023
घरमहाराष्ट्रअबुधाबीमध्ये गेल्या 47 वर्षांपासून साजरा होतो गणेशोत्सव !

अबुधाबीमध्ये गेल्या 47 वर्षांपासून साजरा होतो गणेशोत्सव !

गणेशोत्सव आता केवळ देशभरात मर्यादित राहिला नसून मराठी माणसाने तो सातासमुद्रापार नेला आहे. अरब देशांमध्ये देखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अबुधाबी येथे महाराष्ट्र मंडळाच्यावतीने गेली ४७ वर्षे गणेशोत्सव साजरा केला जात आहे. अबुधाबी मधील यंदाचा गणेशोत्सवहा हा इथला आतापर्यंतचा सर्वात मोठा गणेशोत्सव ठरत आहे. येथे बाप्पाच्या दर्शनासाठी उसळलेल्या गर्दीवरून याची प्रचीती येते.

अबुधाबीस्थित भारतीय दूतवासाचे पदाधिकारी, इंडियन सोशल व कल्चरल सेंटर अबुधाबी यांचे पदाधिकारी, अनेक प्रसिद्ध व्यावसायिक व समाज माध्यमातील सेलिब्रिटींनी या महाराष्ट्र मंडळ आयोजित गणेशोत्सवाला उपस्थित राहून गनरायाचे दर्शन घेतले. यावेळी, महाराष्ट्राच्या परांपरेचे आणि संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात आले. आयोजित करण्यात आलेल्या शोभयात्रेत मराठमोळ्या पोषाखांमध्ये लोक उपस्थित झाले होते. लोकांनी एकत्र येऊन गणपती बाप्पांच्या भक्तिपर मराठी गाण्यांवर नृत्य सादर केली. सोबतीला ढोल ताश्यांच्या वादनामुळे सर्वत्र उत्साह संचारला होता.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने येथे परदेशात स्थायिक झालेल्या लोकांमध्ये अशा उत्सवांमार्फत एकजटुीची भावना येण्यासाठी तसेच त्यांच्या नवीन पिढीस अशा आपल्या सण-उत्सवांबद्दल माहिती व्हावी ह्या हेतूने मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो.

हे ही वाचा 

गणपती, गणेश चतुर्थी आणि ऐतिहासिक संदर्भ

गणपतीतील गर्दीवर नियंत्रण गरजेचे !

गणपती उत्सवाचं महत्त्व जाणून घ्या..

दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतर पुढील दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केली जाते. आधी कोकणात घराघरात साजरा केला जाणाऱा गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा केला जाऊ लागला. मुंबई-पुण्यापर्यंत मर्यादित असणारा सार्वजनिक गणेशोत्सव हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात आणि नंतर सगळ्या देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा होऊ लागला. कालांतराने, शिक्षण आणि नोकरी – व्यवसायनिमित्त परदेशात स्थिरावलेल्या मराठी नागरिकांनी परदेशातही गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. अश्यातच आता अबुधाबी येथे आखाती देशांमधील सर्वात मोठा गणेशोत्सव साजरा केला जात आहे.

येत्या काही महीन्यातच अबुधाबी येथील भव्यदिव्य अशा स्वामीनारायण मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मंडळ, अबुधाबीने या मंदिराची प्रतिकृति उभारली असून त्यामध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी