31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रगणपती उत्सवाचं महत्त्व जाणून घ्या..

गणपती उत्सवाचं महत्त्व जाणून घ्या..

भगवान शिव आणि पार्वतीचा मुलगा श्री गणेश यांचे स्मरण करण्यासाठी राज्यात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाका साजरा केला जातो. ही पारंपरिक पार्श्वभूमी वगळता स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांना एकत्रित आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. राज्यात तेव्हापासून घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला एक वेगळीच किनार लाभली.

गणेश चतुर्थी हा भारतातील सर्वात लोकप्रिय उत्सवांपैकी एक आहे, विशेषत: महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यात गणेशोत्सव मोठ्या संख्येने साजरा केला जातो. सर्व संकटांचे विघ्न करणारा विघ्नहर्ता म्हणजेच श्रीगणेश महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके आराध्य दैवत आहे. प्रत्येक शुभकार्याच्यावेळी श्रीगणेशाचे स्मरण केले जाते.

मराठी केलेंडरनुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात चतुर्थी तिथीला गणेशोत्सव साजरा केला जातो. इंग्रजी कॅलेंडरनुसार ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव साजरा केला जातो.

गणपती आगमन ते अनंत चतुर्दशी या 11 दिवसांच्या काळात घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. गणपती आगमना अगोदर हरताळीका पुजली जाते. गणपती आगमनाच्या सकाळी हरताळीकेचे विसर्जन केले जाते. दीड, पाच,सात आणि अकरा दिवसाच्या भक्तीनंतर गणपतीचं विसर्जन केलं जातं. काही ठिकाणी गणपतीची आई देवी पार्वतीलाही पूजलं जातं. तीन दिवस गणेश भक्त गौरीचं पूजन करतात. गौरी आवाहन,गौरी पूजन आणि गौरी विसर्जन या तीन दिवसांच्या पाहुणचारानंतर पाचव्या किंवा सातव्या दिवशी गणपतीसह गौरी विसर्जन केलं जातं

यंदा १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा केला जाईल. यंदा पाचव्या दिवशी गौरी होईल.

हे ही वाचा 

गणपती उत्सवाच्या काळात ‘या’ भागात बँक बंद

गणेशोत्सव काळात २४ तास रेल्वे सुरू ठेवा : डॉ. जितेंद्र आव्हाड

गणेशोत्सवात मुंबई पोलिसांकडून गणसेवकांची फौज

विविध शहरांकरिता गणेश मूर्ती स्थापनेसाठी शुभ मुहूर्त
शहर – वेळ
नवी दिल्ली – सकाळी ११:०१ ते दुपारी १:२८
चेन्नई – सकाळी १०:५० ते दुपारी १:१६
जयपूर – सकाळी ११:०७ ते दुपारी १:३४
हैदराबाद – सकाळी १०:५७ ते दुपारी १:२३
गुडगाव – सकाळी ११:०२ ते दुपारी १:२९
चंदीगड – सकाळी ११:०३ ते दुपारी १:३०
कोलकाता – सकाळी १०:१७ ते दुपारी १२:४४
मुंबई -सकाळी ११:१९ ते दुपारी १:४३
बेंगळुरू – सकाळी ११:०१ ते दुपारी १:२६
अहमदाबाद – सकाळी ११:२० ते दुपारी १:४३
नोएडा – सकाळी ११:०१ ते दुपारी १:२८

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी