30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeटॉप न्यूजविधानपरिषदेच्या आमदारकीसाठी कोल्हापुरात राजकीय धुळवड

विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी कोल्हापुरात राजकीय धुळवड

अतुल माने : टीम लय भारी

आमचं ठरलं असे ब्रीदवाक्य असलेल्या अस्सल तांबड्या पांढऱ्या रस्स्याप्रमाणे झणझणीत आणि लवंगी मिरची प्रमाणे ठसकेबाज व तिखटजाळ मिसळीचा राजकीय आस्वाद कधी कोणाच्या नशिबात येईल याची खात्री कोल्हापूर मध्ये कोणालाच नसते. इथे कोण कोणाचा ? आणि कधी कोणाचा काटा किर्रर्र होईल याची खात्री नसते. आता विधानपरिषदेच्या एका जागेवरून राज्यमंत्री सतेज पाटील आणि एकेकाळचे सर्व सत्ताधीश असलेल्या महादेवराव महाडिक गटाचे अमल महाडीक यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. त्यामुळे  पुन्हा एकदा सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक गटात होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे (Kolhapur : Political turmoil in Kolhapur for MLA election).

विधान परिषद निवडणुकीत सहा वर्षांपूर्वी सतेज पाटील यांनी महादेव महाडिक यांचा पराभव केला होता. तेव्हा महाडिक हे भाजप आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर मैदानात उतरले होते तर पाटील हे काँग्रेसचे उमेदवार होते. तेव्हा राज्यात भाजपची सत्ता होती. त्यामुळे महाडिक आणि पाटील यांच्यात त्यावेळी जोरदार लढत झाली होती.

कंगना ऐवजी मुस्लिमाने विधान केले असते तर..; असदुद्दीन ओवेसी संतापले

राजकुमार आणि पत्रलेखा यांचा लग्नातला फोटो वायरल,दोघांच्या लूकची सोशल मीडिया वर जोरदार चर्चा

Kolhapur : Political turmoil in Kolhapur for MLA election
विधान भवन

या लढतीत पाटील यांनी महाडिक यांचा पराभव केला. आता सहा वर्षानंतर पुन्हा पाटील हे याच स्थानिक स्वराज्य संस्था गटातून विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरत आहेत. ते पालकमंत्री असल्यामुळे आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्यामुळे त्यांचे पारडे सध्या तरी जड दिसत आहे. कारण तीन पक्षाची मते सध्या त्यांच्या सोबत आहेत. विरोधात भाजपचे अमल महाडीक असल्याने आता साम, दाम, भेद आणि दंड या सर्व अस्त्रचा वापर या निवडणुकीत खुले आम होणार आहे.

सतेज पाटील यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे. त्याबरोबरच गोकुळसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थावर आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. पाटील यांच्या सोबतीला राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आहेत. परिणामी जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे पारडे जड आहे. त्यामुळे सतेज पाटील यांच्याविरूध्द सर्व अर्थाने सक्षम उमेदवार कोण?

याची चाचपणी गेले काही दिवस भाजपकडून सुरू होती. अमल महाडीक यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडीक व आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र आणि जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांची नावे आघाडीवर होती. परंतू सतेज यांच्याविरूध्द लढत देण्यासाठी महाडीक हेच पर्याय असू शकतात, असे ग्राह्य धरून भाजपच्या कोअर कमिटीने अमल महाडीक यांचे नाव निश्चित केले.

डेविड वॉर्नरला मिळालेल्या ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ किताबावर, शोएब अख्तरची नाराजी

Staff of all 12 MSRTC depots in Kolhapur take part in agitation

दरम्यान विधान परिषद निवडणुकीला आता काही दिवस शिल्लक असताना पहिल्या टप्प्यात सतेज पाटील यांनी भेटीगाठी घेत प्रचारातही बाजी मारलेली आहे. त्यांनी जिल्ह्यातील करूंदवाड नगरपालिकेतील भाजपच्या सर्व नगरसेवकांची भेट घेत आपला मतांचा दावा पक्का केला आहे. ही भेट भाजप साठी अनपेक्षित अशीच ठरली आहे. येथील जालंधर पाटील हे भाजपचे महापौर असले तरी सतेज पाटील यांचे ते जवळचे नातेवाईक आहेत. या पालिकेत भाजपच्या २० नगरसेवकांचा समावेश असून कॉँग्रेसचे सहा नगरसेवक आहेत. त्यामुळे सतेज पाटील यांच्यासाठी मतांची ही बेगमी फायद्याची ठरू शकते.

महादेवराव महाडिक यांनीही शिरोळ ला जाऊन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावक्रर यांची भेट घेतली. महाविकास आघाडीचे असलेल्या राजेंद्र पाटील यड्रावक्रर गटाचे  जयसिंगपूर नगरपालिकेत १८ नगरसेवक आहेत. महादेवराव महाडिक हे स्वता जातीने प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत.

त्यामुळे यंदा अनेक थैल्या रिकाम्या होणार असून अनेकाना लक्ष्मी दर्शनाचा लाभ होणार यात शंका नाही. तसेच त्यामुळे पक्षीय चुली बाजूला ठेवून पाहुण्यांरावळ्यांचे राजकारण या चुरशीच्या निवडणुकीत शिजणार आहे. महाडिक यांना विनय कोरे तसेच प्रकाश आवडे यांची मिळणारी साथही महत्वाची ठरणार आहे.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर महाविकास आघाडीची पकड मजबूत आहे. गेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी राज्यामध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. अशावेळी भाजप पुरस्कृत असणाऱ्या महादेवराव महाडिक यांचा सतेज पाटील यांनी पराभव केला होता. आता  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे सतेज पाटील विधानपरिषदेची ही निवडणूक सहज जिंकतील अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदार संख्या ४१७ इतकी असून पक्षीय बलाबल चा विचार केला तर शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस यांच्या महाविकास आघाडीमुळे सतेज पाटील यांचे पारडे तूर्तास जड आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेचा विचार करता जिल्ह्यातील  जयसिंगपूर पालिकेत  27 मतदार असून त्यात  शाहू आघाडी यड्रावकर गट -16 आणि  ताराराणी भाजप 11 असे संख्याबळ आहे. इचलकरंजी  पालिकेत 62 मतदार असून त्यात काँग्रेसचे 18, भाजप 14,  राष्ट्रवादी 7 कारंडे गट 9, ताराराणी आघाडी आवडे गट 11 आणि  शिवसेना 1 असे संख्याबळ आहे. शिरोळ पालिकेत  17 मतदार असून शाहू आघाडी (राष्ट्रवादी)10,  भाजप 6 तर एक जागा रिक्त आहे. हुपरी पालिका 18 मतदार असून त्यात  भाजप 7, ताराराणी गट(आवडे) 5,  मनसे 2  शिवसेना 2 आणि  अपक्ष 2.

आजरा पालिकेत  17 मतदार असून भाजप 9, राष्ट्रवादी-काँग्रेस 6 आणि अपक्ष 2. मलकापूर पालिकेत  17 मतदार असून त्यामध्ये  जनसुराज्य-भाजप-9 आणि  राष्ट्रवादी-सेना 8. पन्हाळा पालिकेत 17 मतदार असून जनसुराज्य 12 तर स्थानिक आघाडी 5. मुरगुड मध्ये 18 मतदार असून शिवसेना 15 आणि राष्ट्रवादी 3. गडहिंग्लज मध्ये 19 मतदार असून  जनता दल 12, राष्ट्रवादी 6 आणि शिवसेना 1. पेठ वडगाव मध्ये 17 मतदार असून युवक क्रांती 13, यादव आघाडी 4. कागल पालिकेत 20 मतदार असून राष्ट्रवादी 9, भाजप 9 आणि शिवसेना 2. चंदगड मध्ये 17 मतदार असून त्यात भाजप 5, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 6 आणि  शिवसेना 4. हातकणंगले मध्ये 17 मतदार असून भाजप 5, शिवसेना 7, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 1 असे संख्याबळ आहे.

२०१४ मध्ये सतेज पाटील यांना अमल महाडीक यांनी  विधानसभा निवडणुकीत पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच २०१५ मध्ये सतेज पाटील यांनी अमल यांचे वडिल व तत्कालीन विधान परिषदेचे आमदार महादेवराव महाडीक यांना पराभवाचा दणका दिला होता. त्यानंतर सतेज पाटील यांची विजयी पताका फडकतच राहीली.

आता अमल यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने ते २०१४ मधील विजयाची पुनरावृत्ती करणार? की सतेज पाटील हे विधान परिषदेचा आपला गड शाबूत राखणार? याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांकडून आपल्याकडे जास्तीत जास्त मते असल्याचे सांगून विजयाचा दावा केला जात आहे.  त्यामुळे या निवडणूकीतील रंगत वाढली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी