29 C
Mumbai
Saturday, June 29, 2024
Homeमहाराष्ट्रअमित शाह मुंबईत आल्यानंतर पहिल्यांदा विनोद तावडेंच्या घरी सांत्वनपर भेट

अमित शाह मुंबईत आल्यानंतर पहिल्यांदा विनोद तावडेंच्या घरी सांत्वनपर भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे शनिवारी सांयकाळी मुंबईत आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केल्यानंतर त्यांचा ताफा विमानतळावरुन थेट भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या घरी गेला. विनोद तावडे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले असून त्यांनी तावडे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

राज्य सरकारच्यावितने अत्यंत महत्त्वाचा असा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येतो. यंदा हा पुरस्कार निरुपणकार आणि सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी मुंबईत रविवारी (दि.१६) रोजी एका भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

दरम्यान अमित शाह आज रात्री सह्याद्री शासकीय विश्रामगृहावर भाजपच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत आगामी महापालिका आणि लोकसभा निवडणुकांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच आगामी निवडणुकांची रणनिती कशी असेल याबाबबद देखील या बैठकीत आढावा घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन; एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी केले स्वागत
जड, अवजड वाहनांना रविवारी नवी मुंबईत प्रवेश बंद

अमित शाह मुंबईत; अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण देणार

राज्यात महाविकास आघाडीमुळे भाजपला फटका बसण्याची चर्चा राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. अशा पार्श्वभूमीवर भाजपची पुढची रणनिती कशी असावी, याबाबत तसेच शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपची पुढील वाटचाल यावर देखील चर्चा होऊ शकते. अमित शाह यांचा हा मुंबई दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी