33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयबाळासाहेब थोरात यांच्यामुळे घुलेवाडी येथे रुग्णालय मंजूर

बाळासाहेब थोरात यांच्यामुळे घुलेवाडी येथे रुग्णालय मंजूर

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यात सातत्याने विविध विकासाच्या योजना राबविल्या जात असून अनेक अद्यावत वैभवशाली इमारती उभ्या राहिल्या आहेत. याच बरोबर तालुक्यातील वाढती लोकसंख्या व रुग्णांची गरज यासाठी बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात 100 बेड सह उपजिल्हा रुग्णालयासाठी मंजुरी मिळाली असल्याची माहिती इंद्रजित भाऊ थोरात व सभापती सुनंदाताई जोर्वेकर यांनी दिली आहे (Hospital sanctioned at Ghulewadi due to Balasaheb Thorat).

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयांमध्ये सध्या 30 अद्यावत बेडची व्यवस्था होती. मागील कोरोना संकटात यामध्ये तात्पुरती वाढ करण्यात आली. यासह ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरही बसवण्यात आले. पाच बायपास मशीन व राज्यातील पहिले आरटीपीसीआर मशीनही ग्रामीण रुग्णालयात बसविण्यात आले. या सुविधांमुळे कोरोना काळात तालुक्यातील व शेजारील तालुक्यांमधील नागरिकांनाही या रुग्णालयातून चांगली सुविधा मिळाली आहे.

बाळासाहेब थोरातांच्या पुढाकाराने पाणी पुरवठा योजनेसाठी 68 लाख 96 हजार निधी मंजूर

बाळासाहेब थोरातांच्या पुढाकाराने मतदारसंघात उभे राहीले नवे कोविड सेंटर

संगमनेर तालुक्यातील वाढती लोकसंख्या, शहरातील चांगल्या वैद्यकीय सुविधामुळे इतर तालुक्यातील रुग्णांची ही वाढती संख्या व नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून संगमनेरमध्ये अद्यावत उपजिल्हा रुग्णालय मंजूर व्हावे यासाठी पाठपुरावा केला (Followed up for approval of updated Sub-District Hospital at Sangamner).

या मागणीला यश येऊन महाविकास आघाडी सरकार तसेच आरोग्यसेवा आयुक्तालयाने सद्यस्थितीतील घुलेवाडी येथील तीस बेडच्या रुग्णालयात नव्याने शंभर बेडची वाढ केली आहे. याच बरोबर हे रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयसाठी मंजुरी दिली असून नव्या सोयीसुविधा निर्मिती करता संबंधित विभागाला आदेश देण्यात आले आहे. यामुळे या नव्या उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य अद्यावत सुविधा, आधुनिक उपकरणे, विविध डॉक्टर्स याचबरोबर विविध मेडिकल स्टाफ ही वाढवला जाणार आहे.

Hospital sanctioned at Ghulewadi due to Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरातांनी सभागृहात मांडली शेतकरी हिताची तीन विधेयके

Twitter accounts of Maharashtra Congress, Balasaheb Thorat suspended, claims party leader Satel Patil

या सर्व सुविधांमुळे घुलेवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रूपाने तालुक्याच्या वैभवात आणखी भर पडणार असून तालुक्यातील गोरगरीब जनतेची व नागरिकांची मोठी सोय होणार आहे. अहमदनगर नंतर संगमनेर शहरात उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाल्याने संगमनेर तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी