29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडचा पालकमंत्री शिवसेनेचा आणि तो भरतशेठच; आमदार भरत गोगावले यांचा अदिती तटकरेंना...

रायगडचा पालकमंत्री शिवसेनेचा आणि तो भरतशेठच; आमदार भरत गोगावले यांचा अदिती तटकरेंना विरोध

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गट सामील झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रीपदावरुन नाराजीना्टय रंगले आहे. रायगडचे शिवसेनेचे तीन आमदार रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावे यासाठी आग्रही आहेत. त्यातच राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे या आमदारांमध्ये नाराजी आहे. मविआ सरकारमध्ये अदिती तटकरे यांच्याकडे पालकमंत्रिपद असल्यापासून ही नाराजी आहे. या सरकारमध्ये अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद नको यासाठी रायगडचे शिवसेनेचे आमदार आग्रही आहेत.

दरम्यान बीबीसी मराठीसोबत आमदार भरतशेठ गोगावले यांनी बोलताना मोठे विधान केले आहे. त्यावरुन रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन असलेला वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. बीबीसीसोबत बोलताना गोगावले म्हणाले, ”अदिती तटकरे यांनी मंत्रीपदची शपथ घेतली आहे, पालमंत्रीपदाची नाही. रायगडचा पालकमंत्री शिवसेनेचा आणि भरतशेठ ! त्यांच्याकडे पालकमंत्रिपद जाणार नाही याची खात्री आहे, आणि गेले तर त्यावेळी पाहू” असे गोगावले म्हणाले.

शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार गेले अनेक दिवस रखडला होता. अजित पवार या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर नऊ आमदारांना शपथ देण्यात आली. त्यात अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदही देण्यात आले आहे. या आमदारांचे खातेवाटप अद्याप झालेले नाही. येत्या 17 जुलै रोजी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यामुळे त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार आणि नव्या मंत्र्यांचे खाते वाटप होईल अशी शक्यता आहे.

राष्ट्रवादीवर नाराज असलेल्या रायगडच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, मेंहद्र थोरवे आणि आमदार भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. रायगडात तटकरे यांना त्यांचा विरोध असल्याने मविआ सरकारमधून बाहेर पडताना त्यांनी आदिती तटकरेच्या पालमंत्रीपदावरुन आरोप केले होते. तटकरे सर्वच कामांचे श्रेय स्वत: घेतात असा आरोप देखील त्यावेळी केला होता. आता अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारसोबत हात मिळवणी केली. ज्या दिवशी हे नाट्य घडून आले त्याच दिवशी शपथविधी देखील पार पडला. यावेळी अदिती तटकरे यांना मंत्रिपदाची शपथ दिली.

 हे सुद्धा वाचा

शिवसेनेत असताना पावसात बैठका घ्यायचो; भुजबळ यांचा पवारांना खिजवण्याचा प्रयत्न

झिरवाळांनी वाढवले एकनाथ शिंदे गटाचे टेन्शन; शिंदे गटाचे आमदार म्हणाले अपेक्षेपेक्षा जास्त बोलू नका!

दिलीप वळसे-पाटील यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून यांना मिळणार उमेदवारी !  

मंत्रिपदाची इच्छा असलेले भरत गोगावले यांना अद्याप मंत्रीपद मिळालेले नाही. त्यात अदिती तटकरे यांना सत्तेत सहभागी होताच मंत्रीपद देण्यात आल्यामुळे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. रायगडचे पालकमंत्रिपद तटकरे यांना देऊ नये असे त्यांचे म्हणणे आहे. आज याबाबत बीबीसीसोबत बोलताना आमदार आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रतोद भरतशेठ गोगावले यांनी रायगडचा पालकमंत्री हा शिवसेनेचाच असेल आणि तो मीच म्हणजे भरतशेठ असे म्हणत त्यांनी तटकरे यांना विरोध केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी