31 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्रओबीसी आरक्षणासाठी बडे नेते एकाच मंचावर येणार?; वडेट्टीवारांनी बोलावली ‘चिंतन’ बैठक!

ओबीसी आरक्षणासाठी बडे नेते एकाच मंचावर येणार?; वडेट्टीवारांनी बोलावली ‘चिंतन’ बैठक!

टीम लय भारी

मुंबई :- मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समजा आणि संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी मुकमोर्चा काढला. त्यावेळी सर्वपक्षीय मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी (OBC) नेत्यांना एकाच मंचावर आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) देखील भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना एकाच मंचावर आणण्यात येणार असल्याचे विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी सांगितले आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या खोचक शुभेच्छांना अण्णांचे चोख प्रत्युत्तर

धनंजय मुंडेंचा ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या भविष्यासाठी मोठा निर्णय!

Parliamentary panel to question Twitter, IT ministry officials today

ओबीसींना आरक्षण (OBC Reservation) मिळावे, आरक्षणातील अडथळे कोणते आहेत? ते कसे दूर करता येतील? त्यावर काय उपाय आहेत? याबाबतचे चिंतन करण्यासाठी विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी लोणावळ्यात एका शिबीराचे आयोजन केले आहे. लोणावळ्यात येत्या 26 आणि 27 जून रोजी चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय शिबिराचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उद्घाटन करणार आहेत. या शिबिराला पंकजा मुंडे, नाना पटोले आणि संजय राठोड यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याचे विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी सांगितले आहे.

चिंतन शिबिरामागे राजकीय हेतू नाही

ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) प्रश्नावर पक्षापलिकडे जाऊन गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. हे शिबिर बोलावण्यामागे कोणतेही राजकारण नाही किंवा कोणतीही राजकीय भूमिका नाही. तसे असते तर मी सर्व पक्षीय नेत्यांना बोलावले नसते. मी कोणत्याही संघटनेत नाही. समाजाचा घटक आणि कार्यकर्ता म्हणून ओबीसी आरक्षणावर (OBC Reservation) लढत आहे, असे विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी स्पष्ट केले आहे.

पुनर्विचार याचिका दाखल करणार

ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) महत्त्वाचा असलेला इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचे काम आयोगाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, कोरोनाचे संकट असल्याने डेटा गोळा करणे कठिण आहे. त्यामुळे केंद्राकडून डेटा मिळावा म्हणून आम्ही कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत. कोर्टाने केंद्राला डेटा देण्याचे आदेश देण्याची विनंती करणार आहोत. तसेच कोरोना संकटात डेटा गोळा करता येईल का याबाबत कोर्टाचे मतही जाणून घेणार असल्याचे विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी सांगितले आहे.

40 ते 50 हजार जागांवर प्रश्नचिन्हे

ओबीसींचा (OBC) इम्पेरिकल डेटा मिळावा म्हणून आम्ही केंद्राला दोन पत्रे लिहिली आहेत. पण डेटा मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांनीही इम्पेरिकल डेटा बाबत पंतप्रधानांना विनंती केली आहे. हा डेटा मिळाला नाही तर सहकार क्षेत्रापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंतच्या अनेक निवडणुकांधील 40 ते 50 हजार जागांवर प्रश्नचिन्हे निर्माण झाले आहेत. त्यामुळेच आम्ही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत, असे विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी