28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपकडून अहिल्यादेवी होळकरांची अवहेलना, धनगर समाजात नाराजी

भाजपकडून अहिल्यादेवी होळकरांची अवहेलना, धनगर समाजात नाराजी

आबासो पुकळे : टीम लय भारी

मुंबई :- मध्यप्रदेश मध्ये सोमवारी गुना येथील देवी लोकमाता अहिल्याबाई होळकर चौकाचे नामोनिशाण मिटवून भाजपचे राज्यसभा खासदार जोतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत भाजपचे पंचायत मंत्री महेंद्रसिंह सिसोदिया यांनी आपल्या आजोबांचे नाव दिले. ही घटना समजताच स्थानिक नागरिकांनी कार्यक्रमस्थळी मंचावर जात जोरदार विरोध दर्शवला. भाजपकडून अहिल्यादेवी होळकरांची अवहेलना झाल्यामुळे धनगर समाजात नारजी व्यक्त केली आहे.

मध्य प्रदेशातील गुना येथे न्यू टेकरी रस्त्याला देवी लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचे नाव होते. तेथील चौकाला देवी अहिल्याबाई होळकर चौक असे ओळखले जात होते, परंतु भाजप मंत्र्याने भारताच्या पहिल्या आदर्श महिला राज्यकर्त्या महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचे नामोनिशाण मिटवून आजोबांचे नाव देण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. यानंतर जमीन दान देणारे जमीनदाते कैन्हय्यालाल पाल यांच्यासह स्थानिक नागरिकांनी थेट कार्यक्रमात जाऊन विरोध दर्शविला, पण जोतिरादित्य सिंधिया यांनी जमीनदात्यांना तुमचे दान द्यायचे काम आहे नाव देण्याचा अधिकार सरकारचा आहे, असे सांगितले. कार्यक्रमानंतर गुना येथील नागरिक रस्त्यावर उतरल्यानंतर जोतिरादित्य सिंधियाना पोलीस बंदोबस्तात पळ काढावा लागल्याचे व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मध्य प्रदेश सह देशभरात जोतिरादित्य सिंधियाचे प्रतिकात्मक पुतळे जाळून निषेध

भिंड येथे बघेल समाजाने आंदोलन छेडत गोहद गुलबंदर येथे सिंधियाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. मंदसौर येथे धनगर गायरी समाजाने सिंधियाचा पुतळा जाळला. तर इंदौर मध्ये मराठी भाषिक समाज संतप्त झाला असून लोकमाता अहिल्यादेवींनी सिंधियानी सुबुद्धी द्यावी असे पोस्टर झळकले आहेत, तसेच रविवार पर्यंत सिंधियानी चूक सुधारावी, अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. होळकर सेनेचे सुरेंद्रसिंह बघेल यांनी लवकरात लवकर सिंधियानी चूक सुधारावी, अन्यथा गवाल्हेर मध्ये सिंधियाच्या जय विलास पॅलेस वर धडक देण्याचा इशारा दिला आहे. आगरा (उत्तर प्रदेश), हारिद्वार, अहमदाबाद येथे जोतिरादित्य सिंधियाचे पुतळे जाळून निषेध केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी