32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रसोयाबीन, कापूस, ऊस उत्पादनवाढीसाठी प्रयत्न; धनंजय मुंडे जाणार ब्राझीलला!

सोयाबीन, कापूस, ऊस उत्पादनवाढीसाठी प्रयत्न; धनंजय मुंडे जाणार ब्राझीलला!

ब्राझीलच्या राजकीय दूतावासामार्फत ब्राझील सरकारमधील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंगळवारी, (26 सप्टेंबर) राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. मुंबई येथे झालेल्या या भेटीत कृषी, कृषी व्यापार आणि गुंतवणूक या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी, धनंजय मुंडे यांनी पारंपरिक पद्धतीने ब्राझीलच्या शिष्टमंडळातील अधिकाऱ्यांचे स्वागत केले.

ब्राझीलच्या या शिष्टमंडळात ब्राझील दूतावासाचे सचिव तथा व्यापार व गुंतवणूक विभागाचे प्रमुख वेगनर, भारतीय दूतावासातील राजदूत केनेथ नोब्रेगा, कौन्सिल जनरल जोआओ मेंदोना, कृषी विभागाचे अँजिलो किरोज हे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये आणि कृषिमंत्री मुंडे यांच्यामध्ये कृषीविषयक अनेक बाबींवर सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेची उपरती म्हणुन ब्राझिलीयन शिष्टमंडळाकडून धनंजय मुंडे यांना ब्राझील भेटीचे निमंत्रण मिळाले आहे. याशिवाय, मुंडे यांना दिल्लीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.


ब्राझिलीयन शिष्टमंडळ आणि कृषिमंत्र्यांमध्ये नक्की काय चर्चा झाली?

ब्राझीलमधील कृषिविषयक विविध गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना ब्राझीलला पाठवण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. कमी पावसात जास्तीत जास्त उत्पादित होणारे सोयाबीन, वातावरणातील बदल आणि त्यानुसार शेतीमध्ये करण्यात येणारे प्रयोग, त्याचे संशोधन, कमी पाण्यात उसाचे अधिकाधिक उत्पादन करणे तसेच बेदाणेची ब्राझीलमध्ये मोठी मागणी असल्याने त्यावरील आयात कर कमी करणे, ब्राझील या देशासोबत तेथील यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या बाबी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी कृषी विद्यापीठाचे संशोधक यांना ब्राझीलला पाठवण्याबाबत चर्चा झाली.

हे ही वाचा

तीन फुट लांबीचे कणीस, तुर्कीतून मागविले बाजरीचे बियाणे; दुष्काळी माण तालुक्यातील शेतकऱ्याची कमाल

गिरीष महाजन पुन्हा सरकारसाठी ठरले संकटमोचक; धनगर समाजाचे आंदोलन मागे

बारामतीमधून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार?

यावेळी, ब्राझिलीयन शिष्टमंडळाला धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्रातील पारंपरिक शेती व त्यामध्ये होत असलेल्या नवनवीन प्रयोगांविषयी माहिती दिली तसेच राज्यातील कृषी क्षेत्रात असलेल्या गुंतवणुकीच्या संधींबाबतही माहिती दिली.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अजित पवार हे 40 आमदारांना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. अजित पवारसह 9 मंत्र्यांनी जुलै महिन्यात विविध मंत्रीपदांची शपथ घेतली होती. त्यावेळी, धनंजय मुंडे यांनी राज्याचे कृषिमंत्री म्हणुन शपथ घेतली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी