29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeव्यापार-पैसा'ड्रीम11'ला 40 हजार कोटींचा करचुकवल्याची नोटीस? कंपनीची थेट उच्च न्यायालयात धाव

‘ड्रीम11’ला 40 हजार कोटींचा करचुकवल्याची नोटीस? कंपनीची थेट उच्च न्यायालयात धाव

ड्रीम11 या ऑनलाईन गेमिंग कंपनीची पितृकंपनी ड्रीम स्पोर्ट्स या कंपनीवर जीएसटी चुकवल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. इकोनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार ही करचुकवेगिरी 25 हजार कोटींची आहे. तर प्रत्यक्षात ड्रीम स्पोर्ट्स या कंपनीने 40 हजार कोटींचा जीएसटी चुकवल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकरणी आता ड्रीम स्पोर्ट्स कंपनीनेही मुंबई उच्च ऩ्यायालयात धाव घेऊन नोटिसीला आव्हान दिले आहे.

ड्रीम11 या कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 3 हजार 841 कोटींची उलाढाल केली असून 142 कोटींचा नफा कमावला आहे. तरीही कंपनीने बेटिंगच्या फेसव्हॅल्यूवर 28 टक्के जीएसटी भरला नसल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर थेट ड्रीम स्पोर्ट्स कंपनीनेच जीएसटी भरण्याच्या नोटिसीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

डीजीजीआय म्हणजे जीएसटीच्या महासंचालकांनी ऑनलाईन रियल मनी गेमिंग क्षेत्रातील डझनभर कंपन्यांना एकूण 55 हजार कोटींच्या नोटिसा बजावल्या आहेत. या सर्व कंपन्यांवर कर चुकवल्याचा आरोप आहे. यातीलच एकट्या ड्रीम स्पोर्ट्स कंपनीवर 25 हजार कोटींच्या करचुकवेगिरीचा आरोप आहे. तर मिंटने दिलेल्या वृत्तानुसार ड्रीम स्पोर्ट्सने 40 हजार कोटींचा जीएसटी चुकवला आहे. मिंटने दिलेला आकडा खरा मानला तर अप्रत्यक्ष करवसुलीसाठी बजावण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात रकमेची नोटीस आहे.

सोयाबीन, कापूस, ऊस उत्पादनवाढीसाठी प्रयत्न; धनंजय मुंडे जाणार ब्राझीलला!

गिरीष महाजन पुन्हा सरकारसाठी ठरले संकटमोचक; धनगर समाजाचे आंदोलन मागे

शिक्षक भरतीच्या मागणीसाठी तरुणाने मंत्रालयात सुरक्षा जाळीवर घेतली उडी

या प्रकरणी ड्रीम स्पोर्ट्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला असला तरी त्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे सरकारच्या नोटिसीला ड्रीम स्पोर्ट्स कंपनी आता कायद्याच्या भाषेत उत्तर देणार एवढे नक्की. भारतात ऑनलाईन गेमिंग कंपन्या फोफावल्या आहेत आणि सर्वसामान्य माणूस या गेमिंगच्या जाळ्यात ओढला जात आहे. दरम्यान, आता ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर जीएसटी करवसुलीचा बडगा उगारल्याने या क्षेत्रातील सर्व कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी