33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रजातवार जनगणना भारताचा एक्सरे; राहुल गांधी म्हणाले, मोदी डेटा दाखविण्यास घाबरतात

जातवार जनगणना भारताचा एक्सरे; राहुल गांधी म्हणाले, मोदी डेटा दाखविण्यास घाबरतात

संसदेच्या विषेश अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यापासून राहुल गांधी यांनी जातवार जनगणनेवरुन मोदी सरकारला घेरले आहे. आज राहुल गांधी छत्तीसगढमध्ये आवास न्याय सम्मेलन या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी जातवार जणगणनेवर भाष्य केले. काँग्रेसने सन 2011 मध्ये जातवार जनगणना केली होती. मात्र त्याचा डाटा मोदी सरकार उघड करत नसल्याचे गांधी म्हणाले.

छत्तीसगढमध्ये भूपेश बघेल यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस पक्ष सत्तेत असून आता काही महिन्यांत येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. दरम्यान आवास न्याय सम्मेलन या कार्यक्रमासाठी राहुल गांधी सोमवारी (दि. 25) रोजी छत्तीसगढ दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी जातवार जनगणनेच्या मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी राहुल गांधी यांनी निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करण्याचे आश्वासन देखील दिले. यावेळी त्यांनी राजस्थान, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा दाखला दिला.

जातवार जनगणनेवर बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला. ते म्हणाले, काँग्रेसने सन 2011 मध्ये जातवार जनगणना केली होती. त्यामध्ये भारतात कोणत्या जातीचे किती लोक आहेत, याचा डाटा आहे. नरेंद्र मोदी हा डाटा जनतेला दाखवू इच्छित नाहीत. मी संसदेत जनगणनेवर बोललो तेव्हा कॅमेरा फिरविण्यात आल्याचे देखील ते म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले, भारत सरकार खासदार चालवित नाहीत. ते कॅबिनेट सेक्रेटरी (सचिव) आणि विविध खात्यांचे सेक्रेटरी चालवितात. या खात्यांमधील 90 टक्के सेक्रेटरी प्रत्येक योजनेबाबत निर्णय घेतात. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखीलल सरकारच्या काळात 90 टक्के सेक्रेटरींमध्ये केवळ तीन सेक्रेटरी ओबीसी कॅटेगरीमधील आहेत.


यावेळी राहुल गांधी यांनी सवाल केला की, आपल्या देशात काय केवळ 5 टक्के ओबीसी लोकसंख्या आहे का? या प्रश्नाचे उत्तर केवळ जनगणनेतूनच मिळणार आहे. ते म्हणाले, ज्या पद्धतीने रुग्णाला मार लागल्यानंतर डॉक्टर एक्सरे काढतो, त्याच प्रमाणे जातवार जनगणना हा भारताचा एक्सरे आहे. त्यामधून देशात किती ओबीसी, दलित आदिवासी, महिला आणि सामान्य जातीचे लोक आहेत, याची माहिती मिळू शकते. एकदा हा डाटा समोर आला की, प्रत्येकाला त्यांच्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधीत्व दिल्यानंतर देश पुढे जाईल.

हे सुद्धा वाचा 
सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंचे कौतुक करताना भाजपवर सोडले बाण !
बावनकुळेंवर वडेट्टीवार, दानवेही कडाडले
चंद्रशेखर बावनकुळेंना सुप्रिया सुळेंनी फटकारले; पत्रकारांबाबतच्या वक्तव्याचे पडसाद उमटले ! 

राहुल गांधी म्हणाले, मी संसदेत मोदींना विचारले की, आपण जातवार जनगणनेला का घाबरता? त्यांचे मंत्री म्हणतात आमचे औबीसी आमदार, आणि खासदार आहेत. मग त्याच खासदारांशी जेव्हा बोलतो तेव्हा ते म्हणतात आम्हाला कोणी विचारत नाही. आम्ही केवळ मुर्तीसारखे इथे आहोत. जर ओबीसी, दलित, आदिवासींना भागिदारी द्यायची असेल तर जातवार जनगणना करावी लागेल. जर जातवार जनगणना झाली नाही, तर आमचे सरकार जातवार जनगणना करेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी