26 C
Mumbai
Wednesday, November 29, 2023
घरराजकीयचंद्रशेखर बावनकुळेंना सुप्रिया सुळेंनी फटकारले; पत्रकारांबाबतच्या वक्तव्याचे पडसाद उमटले !

चंद्रशेखर बावनकुळेंना सुप्रिया सुळेंनी फटकारले; पत्रकारांबाबतच्या वक्तव्याचे पडसाद उमटले !

होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुका भाजपने गांभिर्याने घेतल्या आहेत. त्यादृष्टीने भाजपचेराज्यभरात बैठकांचे सत्र सुरु आहे. अहमदनगरमधील बैठकीत दिसून आले. आपल्या विरोधात पत्रकारांनी बातम्या देऊ यासाठी पत्रकारांना चहापान, ढाब्यावर घेऊन जा! असा आदेशच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बावनकुळे यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

पत्रकारांनी आपल्याविरोधात 2024 पर्यंत एकही बातमी छापू नये यासाठी चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असा सल्ला देतानाच पत्रकारांना ढाब्यावर देखील घेऊन जाण्याबाबत बावनकुळे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळविणे, आपल्या पक्षाचे जास्तीजास्त उमेदवार निवडुन आणण्यासाठी भाजप जमीन नांगरत आहे. त्यासाठी भापजकडून जमीनीची चाचपणी करत असून आपल्या विरोधात जनमत तयार होऊ नये यासाठी पत्रकारांनाच वाघूर घालण्याचा प्रयत्न करत आहे. तसे पक्षश्रेष्ठींकडूनच पदाधिकाऱ्यांना सांगितले जात आहे.

दरम्यान बानकुळे यांच्या विधानाचे वृत्त प्रसिद्ध होताच समाजमाध्यमांवर जोरदार प्रतिक्रीया उमटल्या. विरोधी पक्षांकडून देखील बावनकुळेंचा समाचार घेतला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स (ट्विटर)वर याबाबत प्रतिक्रीया देताना म्हटले की, विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही‌. लोकशाहीत वर्तमानपत्रे हि विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात हि अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे.


ज्याअर्थी चंद्रशेखर बावनकुळेजी कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे. भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌.

हे सुद्धा वाचा 
बोहल्यावर चढली अन् परिणीती चोप्राची चढ्ढा झाली
पंकजा मुंडे यांना केंद्राचा झटका !
ऑस्ट्रेलियाला नमवून भारताने केले अनोखे विक्रम

बावनकुळे यांच्या विधानाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे, विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील बावनकुळेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी