27 C
Mumbai
Friday, December 8, 2023
घरमहाराष्ट्र...आणि आमदार जितेंद्र आव्हाडांचा रुबाब वाढला

…आणि आमदार जितेंद्र आव्हाडांचा रुबाब वाढला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली आणि 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत शेवटची बैठक झालेल्या विरोधी आघाडीच्या भारतासाठीच्या योजनेवर चर्चा केल्याचे समजते. पण या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार, पक्ष प्रतोद आणि माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्याबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याबरोबर बसल्याचा फोटो आव्हाड यांनीच ट्विट केला आहे. अजित पवार यांनी भाजपाबरोबर संधान साधल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे वातावरण आहे. अशा बिकट काळात पक्षातील जुनेजाणते नेते, शरद पवार यांनी ज्यांचे राजकीय करियर घडवले असे नेते त्यांना सोडून गेले. पण.. पण.. पण जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्याबरोबर सावलीसारखे राहिले. त्यामुळेच की काय इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत आव्हाड यांचा वावर होता. पवार यांच्या अनेक राज्यस्तरीय मेळावे, बैठकमध्ये ते दिसतात. मात्र शुक्रवारी आव्हाड थेट राष्ट्रीय नेत्याबरोबर दिसले. त्यामुळेच की काय  आव्हाड याचा रुबाब वाढला अशी चर्चा आता त्यांच्या पक्षात आहे.

५ ऑगस्ट १९६३ मध्ये नाशिक येथे जन्म झालेल्या जितेंद्र आव्हाड यांचे राजकीय करियर कॉँग्रेसमधून सुरू झाले. ते एनएसयूआयमध्ये कार्यरत होते. विविध आंदोलनांतून ते प्रसिद्ध होते. शरद पवार यांनी या ब्ल्युआईड बॉयला हेरले.
त्यांच्यातील कार्यकर्त्याला घडवले. आव्हाड बी.ए., मास्टर ऑफ लेबर स्टडीज (एमएलएस), पीएच.डी. आहेत. ठाणे जिल्ह्यातील एक उच्च विद्याविभूषित आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते. जितेंद्र आव्हाड हे २००९, २०१४ व २०१९मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यापूर्वी ते विधान परिषदेचे आमदार होते. २९ मे २०१४ मध्ये ते वैद्यकीय शिक्षण, फलोत्पादन, रॉजगर हमी योजना मंत्री होते.

हे सुद्धा वाचा
…तरच अजित पवार मुख्यमंत्री होतील; छगन भुजबळांचं जाहीर वक्तव्य
धनंजय मुंडे म्हणतात, मला कामे करू द्या !
एफडीए झाला ओसाड गावचा पाटील

३० डिसेंबर २०१९ ते २९ जून २०२२ मध्ये ते गृहनिर्माण मंत्री झाले. नंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. २ जुलै रोजी अजित पवार हे राष्ट्रवादीमधील ८ आमदारासह सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे त्यांचे विरोधी पक्ष नेते पद आपसूक आव्हाड यांच्याकडे आले. सोबत त्यांना पक्षाचा प्रवक्ता करण्यात आले. पण राष्ट्रवादीचे आमदार कमी झाल्याने विरोधी पक्षनेते पद कॉँग्रेसकडे गेले. विजय वडेट्टीवार हे नंतर विरोधी पक्षनेते झाले.

आव्हाड यांच्याकडे पक्ष प्रतोद पद कायम आहे. असे असताना आता राष्ट्रवादीमधील बंडाळी नंतर शरद पवार यांची भूमिका आव्हाड प्रभावीपणे मांडत आहे. यासाठी त्यांनी अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांशी वैर घेतले आहे. त्यातून शरद पवार आव्हाड यांचे केंद्र स्तरावर वजन तर वाढवत नाही ना, अशीही चर्चा आहे. ते प्रभावी आहेत, शिवाय ओबीसी असल्याने भुजबळ यांच्यानंतर ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील ओबीसी चेहरा आहेत. हा सगळा विचार करून शरद पवार हे आव्हाड यांना चांगलेच फुटेज मिळवून देत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी