31 C
Mumbai
Thursday, June 13, 2024
Homeक्रिकेटक्रिकेट विश्व चषक स्पर्धेतील वेगवान शतक, 'या' खेळाडूने केली किमया !

क्रिकेट विश्व चषक स्पर्धेतील वेगवान शतक, ‘या’ खेळाडूने केली किमया !

देशात सध्या क्रिकेट विश्वचषक सुरू आहे. यामुळे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष हे जगभरातील सर्वच संघातील खेळाडूंकडे लागले आहे. यंदाच्या विश्वचषकात युवा खेळडू चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. याची प्रचिती कालच्या पाकिस्तान आणि नेदरलँड सामन्यात पाहायला मिळाली. या सामन्यात जरी पाकिस्तान संघ जिंकला असला तरीही नेदरलँडच्या लीड या खेळाडूने केलेल्या कामगिरीची चर्चा होताना दिसत आहे. 50 हून अधिक धावा करणारा आणि अधिक गडी बाद करणारा खेळाडू म्हणून त्याची चर्चा होऊ लागली. त्याचप्रमाणे आजच्या (7 ऑक्टोम्बर) श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेत सामना रंगला या सामन्यात क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमने वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावून इतिहास रचला आहे.

त्याने अवघ्या 49 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यापूर्वी हा विक्रम आयर्लंडच्या केविन ओब्रायन या खेळाडूच्या नावावर होता, ज्याने 50 चेंडूत शतक झळकावले होते. त्याचप्रमाणे 2011 च्या विश्वचषकात आयर्लंडच्या केविनने इंग्लंडविरुद्ध 50 चेंडूत शतक झळकावले होते. तर मार्करमने श्रीलंकेविरुद्ध वनडे विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा पराक्रम केला. मार्करमने अवघ्या 54 चेंडूत 106 धावा केल्या आहेत. यात 14 चौकार आणि 3 षटकार लगावत पुन्हा तो तंबुत परतला. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलीयर्सने देखील 52 चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम केला मात्र आता तो विक्रम मार्करमने मोडीत काढला. तिसऱ्या क्रमांकावर असलेला डिव्हिलीयर्स मागे चौथ्या क्रमांकावर गेला आहे.


हेही वाचा 

वर्ल्ड कप 2023 अपडेट्स: जाणून घ्या क्रिकेटच्या ताज्या अपडेट्स!

स्विंग बॉलिंगचा बादशाह झहीर खानचा आज वाढदिवस

पाकिस्तानचा विजय पण नेदरलँडच्या या खेळाडूने फोडला घाम

वेगवान शतक करणारे हे आहेत फलंदाज 

दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमने श्रीलंका विरुद्ध विश्वचषक 2023 मध्ये  49 चेंडूत आतापर्यंत सर्वात वेगवान शतक ठोकलं.

केविन ओब्रायन या आयर्लंडच्या खेळाडूने इंग्लंड विरूद्ध विश्वचषक 2011 मध्ये 50 चेंडूत शतक ठोकलं.

ग्लेन मॅक्सवेल या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने श्रीलंका विरुद्ध 2015 सालच्या विश्वचषकामध्ये 51 चेंडूत शतक केलं

एबी डिव्हिलियर्स या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने वेस्ट इंडिज विरुद्ध 2015 च्या विश्वचषकात  52 चेंडूत शतक झळकवलं होतं.

2019 मध्ये इऑन मॉर्गन या इंग्लंडच्या खेळाडूने अफगाणिस्तान विरुद्ध 57 चेंडूत शतक केले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी