34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रराऊतांनी केलेली चेष्टा त्यांच्याच अंगाशी येणार: चंद्रकांत पाटलांचा इशारा

राऊतांनी केलेली चेष्टा त्यांच्याच अंगाशी येणार: चंद्रकांत पाटलांचा इशारा

टीम लय भारी 

कोल्हापूर: शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashvant Jadhav) यांच्या चौकशीत प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना (Aayakar Vibhag) एक डायरी सापडली असून त्यात संशयास्पद व्यवहार समोर आले आहेत. या डायरीत दोन व्यवहार आढळून आल्याने संशय निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांचे (Income Tax Officer) म्हणणे आहे.

‘मातोश्री’ला ५० लाख रुपयांचे घड्याळ आणि दोन कोटी रुपयांचे आणखी एक गिफ्ट देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मातोश्री हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान आहे, जे मुंबईतील वांद्रे येथे आहे. मात्र, शिवसेनेचे (Shivsena) नेते यशवंत जाधव यांनी ते चुकीचे ठरवत डायरीत आईसाठी लिहिल्याचे सांगितले आहे. यावर आता विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांचा (Sanjay Raut) उल्लेख करत या प्रकणावरुन प्रतिक्रिया दिली आहे. “अशी डायरी सापडली की नाही याबद्दल मला काही माहिती नाही. पण मला एवढंच दिसत आहे की खूप काही तरी होणार आहे आणि मी यापूर्वी पासून सांगत आलोय कि काही जात्यात आहेत तर काही सुपात आहे सुपात असलेल्यांची वेळ आता जवळ आली आहे.

वारंवार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून माझी चेष्टा केली जाते. पण सगळी चेष्टा अंगावर येणार आहे कारण मी जे म्हणत आहे ते सगळं खरे ठरत चाललं आहे. एसटी कर्मचारी संपाविषयी ते म्हणाले, एसटीचा संप मिटला नाही तर एक लाख घरे उद्ध्वस्त होतील. या संपामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. अजित पवारांनी सगळे श्रेय घ्यावे, पण हा संप मिटवावा असे आवाहन चंद्रकांत पाटीलांनी केले आहे.

हे सुध्दा वाचा 

सामना वाचणं बंद केलं, राऊतांवर बोलणं बंद केलं – चंद्रकांत पाटील

Chandrakant patil : भाजपा नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्याचं स्वागत करतो, पण…; चंद्रकांत पाटलांनी सरकारला दिला सल्ला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी