29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeराजकीयलफंगेगिरीला हिंदूत्त्ववादामध्ये स्थान नाही, संजय राऊत यांचा भाजपला टोला

लफंगेगिरीला हिंदूत्त्ववादामध्ये स्थान नाही, संजय राऊत यांचा भाजपला टोला

शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी भाजप सरकारला टोला लगावला आहे. यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (Bjp),महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi), गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar), कीरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर भाष्य केले. केंद्र सरकारचं धोरण हे सार्वजनिक उपक्रम विकण्याचं म्हणजेच देश विकण्याचं. त्या विरोधामध्ये अनेक संघटना एकत्र येऊन हा बंद पुकारला आहे. निवडणुकांमध्ये फक्त रोजगार देण्याच्या घोषणा करायच्या आणि त्यानंतर फक्त तीन महिने फुकट रेशन द्यायचं मग रोजगार कसा निर्माण करणार जो पर्यंत उद्योग वाढच नाहीत कींवा सार्वजनिक उपक्रमाला ताकद दिली जात नाही तोपर्यंत रोजगार वाढणार नाही. गेल्या ५०-५५ वर्षापासूनचा अधिक काळ या देशातला सर्वााधिक रोजगार हा पब्लिक सेक्टरसने दिला आहे. सरकारी उद्योगांनी दिला आहे. हे उद्योग संपुष्टात आणून आपल्या मर्जीतल्या फक्त दोन पाच खासगी उद्योगांना संपूर्ण देशा ताब्यात द्यायचा.यामुळे रोजगार वाढणार नाही तर काही मोजक्या लोकांची संपत्ती वाढेल पर्यायाने भाजप सरकारची संपत्ती वाढेल आणि कोट्यावधी लोक भिकारी आणि बेरोजगार होतील.त्याविरुद्ध हा लोकांचा संताप आहे, असे संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut Criticized on Bjp)

देवाच्या चरणी तरी खरे बोला

देवाच्या चरणी प्रत्येकानेच खरे बोलले पाहिजे. जर तुम्ही हिंदुत्ववादी आहात आणि हिंदूत्व वादाचा पुरस्कार करुन देव-धर्म मानत असाल तर प्रत्येकाने आपले वर्तन काय आहे आणि देवाच्या दरबारत तरी आपण किती खर बोलत आहोत हे तपासून पाहावं. महाराष्ट्रामध्ये ज्याप्रकारचा खोटेपणाचा कळस उभारला जातो विरोधी पक्षाकडून ज्या प्रकारची महाविकास आघाडी नेत्यांची यथोच्छ बदनामी मोहिम राबवली जात आहे. ज्या प्रकारचे कटकारस्थान आणि लफंगेगिरी केली जात आहे. त्यावर मला असं वाटतंय हिंदूत्ववादामध्ये त्याला स्थान नाही. सध्या विरोधी पक्षाच्या असंच आहे ‘खोटं बोला पण रेटून बोला.असा निशाणा संजय राऊत यांनी भाजपवर  साधला आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणासंदर्भात बोलावं?

नाणार प्रकल्पाविषयी स्थानिकांचं मतपरिवर्तन अद्याप झाल्याची माझ्याकडे माहिती नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणासंदर्भात जास्त बोललं पाहिजे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

गोव्यातील जनतेला दिलेला शब्द पूर्ण करा

गोव्याच्या जनतेने भाजप पक्षाला बहुमताने जागा निवडून दिल्या आहेत. त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. आणि नवीन सरकार जर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली येत असेल तर त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात जी वचन दिली आहेत .ती त्यांनी पूर्ण करावीत खास करुन रोजगारासंदर्भात. पाच लाख रोजगार निर्माण करु आमचं सरकार आल्यावर असं प्रमोद सावंत म्हणाले परंतु त्याअगोदर प्रमोद सावंत यांचंच सरकार होतं त्यावेळी तुम्ही काय केलात हा सवाल येतो.आता आणखी पाच वर्ष मिळालेली आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदित्य ठाकरे यांचं आगमन होणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. संपूर्ण कोकणात शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.

वैफल्यग्रस्त नेते कोणत्या थराला जाऊ शकतात ?

वैफल्यग्रस्त माणस, वैफल्यग्रस्त पक्ष, वैफल्यग्रस्त नेते कोणत्या थऱाला जाऊ शकतात त्याची किरीट सोमय्यांची दापोली आणि सांगली ही दोन्ही उदाहरणे आहेत. मला असं वाटतंय त्याबाबत जनताच काय ते निर्णय घेईल .अहिल्याबाई होळकर किंवा इतर युगपुरुष या महाराष्ट्रात जन्माला आले आहेत. त्यांच्या याप्रकारे राजकारण कोणीही करु शकतं. शरद पवार यांच्यासारख्या नेत्याच्या हातून एखाद्या स्मारकाचे उद्घाटन होत असेल त्याने अशा प्रकारे राजकीय विरोध केला जात असेल तर काहीतरी लोकांच्या मानसिकतेमध्ये गडबड आहे, असा टोला कीरीट सोमय्या आणि गोपिचंद पडळकर यांना लगावला आहे. (Sanjay Raut Criticized on Bjp)


हे सुद्धा वाचा : 

Sanjay Raut slams MVA govt for no action against BJP leaders involved in wrongdoings

Sanjay Raut : तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा

Sanjay Raut : ईडीचा नवा खुलासा:प्रवीण राउत-संजय राउत यांच्या पत्नी पार्टनर! वर्षा राउत यांना 55 लाखांचे बिनव्याजी कर्जही दिले, ED चा गंभीर आरोप

सरकारला जागयावी यासाठी २३ मे २०२२ रोजी धनगर समाजाचे आंदोलन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी