28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रConstable found dead : फलटणमध्ये हवालदार सापडले मृतावस्थेत

Constable found dead : फलटणमध्ये हवालदार सापडले मृतावस्थेत

टीम लय भारी

सातारा : राज्य उत्पादन शुल्क विभाग, कोल्हापूर येथे कार्यरत असलेले हवालदार विजय रामचंद्र मुळीक (वय-५७) हे काल सायंकाळी सात वाजता फलटण शहरात मृतावस्थेत (Constable found dead) सापडले. या घटनेची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत असलेले हवालदार मुळीक हे लॉकडाउनमुळे आपल्या घरी सावता माळी नगर, कोळकी, ता. फलटण येथे आले होते. त्यानंतर ते परत कोल्हापूर येथे कामावर रुजू झाले नव्हते. त्यांना दारूचे व्यसन असल्याने ते दारू पिण्यासाठी फलटण शहरात येत होते. दि २ जून रोजी ते नेहमीप्रमाणे कोळकी येथून फलटणला सकाळी आले. पण सायंकाळी परत घरी गेले नाहीत. त्यांचा शोध घेतला असता माळजाई मंदिर, फलटण या ठिकाणी ते मृतावस्थेत सापडले.

फलटण येथील शासकीय रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन केले असता लिव्हर खराब झाल्याने व हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

या घटनेची फलटण शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू नं-२२/२० सीआरपीसी क्रमांक १७४ अनव्ये नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार लावंड अधिक तपास करीत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी