30 C
Mumbai
Saturday, August 5, 2023
घरव्हिडीओशेतकऱ्यांना दुधासाठी लिटरमागे 5 रुपये अनुदान मिळावे - शरद पवार

शेतकऱ्यांना दुधासाठी लिटरमागे 5 रुपये अनुदान मिळावे – शरद पवार

"यापूर्वी असा प्रकार एकदा झाला होता. त्यावेळी दर लिटरच्या पाठीमागे जवळपास पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने ठराविक काळासाठी घेतला होता."

शेतकऱ्यांना दुधासाठी लिटरमागे 5 रुपये अनुदान मिळावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. बारामतीत राज्यातील सध्याच्या स्थितीबाबत जनतेला आवाहन करणारी पत्रकारपरिषद पवारांनी घेतली. त्यानंतर त्यांना स्थानिक माध्यम प्रतिनिधींनी दूध उत्पादकांच्या समस्येबाबत विचारणा केली. त्यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे पवारांनी सांगितले.

शरद पवार यांना दुधाच्या दरासंदर्भात समस्येची माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडल नुकतेच भेटले होते. शेतकऱ्यांना दुधासाठी थेट अनुदान कसे मिळेल, यासाठी आपण काही करणार का, असा प्रश्न पवारांना विचारला गेला. त्यावर ते म्हणाले, “यापूर्वी असा प्रकार एकदा झाला होता. त्यावेळी दर लिटरच्या पाठीमागे जवळपास पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने ठराविक काळासाठी घेतला होता.”

पवारांनी सांगितले, “शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा आहे. तसेच जिथे जिराईती शेती आहे तिथे दुधाचा व्यवसाय हा त्या कुटुंबाचा संसार चालवतो. दुधाची किंमत इतकी घसरली आहे की सामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते अजिबात योग्य नाही. यासाठी मी स्वत: राज्य सरकारशी विचारविनिमय करून त्यांना यातून मार्ग काढण्याची विनंती करणार आहे.”

हे सुद्धा वाचा : 

शरद पवार म्हणाले, माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे !

दूध पिऊन झोपल्याने चांगली झोप येते का ? जाणून घ्या खरं कारण

मोदी सरकारचे धोरण शेतकरी विरोधी – शरद पवार

Dudh Anudan, Sharad Pawar, Bonus for Milk Farmers, 5 Rupees Per Liter Bonus, Dudh Utpadak Shetkari

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी