33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रतुम्हाला माहिती आहे का, जन्माष्टमीनंतर दहिहंडी का साजरी केली जाते ?

तुम्हाला माहिती आहे का, जन्माष्टमीनंतर दहिहंडी का साजरी केली जाते ?

भगवान विष्णूचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म भारतात जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. उत्तर प्रदेशाच्या मथुरा शहरात भगवान श्रीकृष्णानं बालपण व्यतीत केलं. बालपणापासूनच श्रीकृष्णाला दही, तूप, लोणी आवडायची. घरातली दही, तूप, लोणी फस्त केल्यानंतर श्रीकृष्ण शेजाऱ्यांच्या घरी चोरून हे पदार्थ खायचे. या कृष्णलीला साजरे करण्यासाठी जन्माष्टमी नंतर दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.

दहीहंडी उत्सव प्रामुख्याने गुजरात महाराष्ट्र आणि गोवा राज्यात साजरा केला जातो. श्रीकृष्ण घरातील उंच भागावर मडक्यात टांगलेली दही,तूप,लोणी खाण्यासाठी आपल्या सवंगड्यांची मदत घ्यायचे. मित्रांचा त्रिकोणाचा थर बनवून चढून जात श्रीकृष्ण दही,तूप,लोण्याचे मडके फोडायचे. नटखट कान्हाच्या कृष्णलीला पाहता माता यशोदाकडे दररोज स्त्रियांच्या तक्रारी येऊ लागल्या. एके दिवशी तक्रारींना कंटाळून यशोदानं चक्क श्रीकृष्णाला बांधून ठेवलं. आईचा डोळा चुकवून शरीराला बांधलेली गाठ अलगद बाजूला सारत श्रीकृष्णानं आपला बालहट्ट पुरवलाच.

तारुण्यात श्रीकृष्णानं दुष्ट मामा कंसाचा वध केला. त्यानं कौरव पांडवांच्या महायुद्धात राजनीति आखून पांडवांना जिंकून दिलं. श्रीकृष्णानं हस्तीनापुर शहरातील जनतेला कौरवांच्या जाचक अन्यायातून मुक्त केले. भगवान श्रीकृष्ण स्वतः आताच्या गुजरात राज्यातील द्वारका शहराचे राजा होते.

हे सुद्धा वाचा 
फडणवीसांनी गुन्हा केला म्हणून माफी मागितली, जालना लाठीचार्जप्रकरणी नाना पटोलेंचा घणाघात
INDIA आघाडीत रणनीती, कल्पकतेचा अभाव हे मतदारांना दाखवणे आरएसएसचा अजेंडा -प्रकाश आंबेडकर
निजामकालीन नोंदी असतील तरच मिळणार कुणबी दाखले; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

त्यामुळे गुजरात राज्यात कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. भगवान श्रीकृष्णांचे स्मरण म्हणून पुरुष आणि स्त्रिया मनुष्यबळाचे थर तयार करून उंचावर बांधलेली दहीहंडी फोडतात. दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम सुखरूप पार पाडल्यानंतर फळ आणि गोड पदार्थ प्रसाद म्हणून वाटले जातात. हंडी फोडल्यानंतर दिवसभर श्रीकृष्णांच्या गाण्यावर ठेका धरला जातो. गेल्या काही वर्षात महिलाही मोठ्या संख्येने हिरीरीने दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी