30 C
Mumbai
Wednesday, September 6, 2023
घरराजकीयINDIA आघाडीत रणनीती, कल्पकतेचा अभाव हे मतदारांना दाखवणे आरएसएसचा अजेंडा...

INDIA आघाडीत रणनीती, कल्पकतेचा अभाव हे मतदारांना दाखवणे आरएसएसचा अजेंडा -प्रकाश आंबेडकर

इंडिया आघाडी येत्या काळात भाजपला पर्याय ठरणार असे बोलले जात आहे.असे असतानाच,  या आघाडीत अजून अनेक उणीवा आहेत, ही बाब  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी निदर्शनास आणली आहे. ‘India vs भारत’ वादावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले असून ‘संविधानाच्या पहिल्या कलमाशी खेळून भाजप-आरएसएसने #IndiaAliance ला मुर्खात काढले’ असल्याची टीका त्यांनी केली आहे.

‘INDIA आघाडीत रणनीतीचा अभाव तसेच कल्पकता आणि ज्ञानाची दिवाळखोरी आहे हे मतदारांना दाखवणे हाच आरएसएसचा अजेंडा आहे. भाजप-आरएसएसला हेच हवे आहे आणि इथेच INDIA हरला आहे, कारण हा भाजप-आरएसएसचाच अजेंडा आहे,’ अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. याबाबतचे ट्विट त्यांनी केले आहे.

राष्ट्रपती यांनी पाठवलेल्या निमंत्रणावरून देशाच्या नावसंदर्भात नावाचं वाद सुरू झाल्याचे दिसून येते. निमंत्रणावर देशाचं नाव India ऐवजी भारत लिहिल्याने #IndiaAliance च्या नेत्यांनी विविध विधाने करून हे सर्व त्यांच्या आघाडीला घाबरून केले जात असल्याची टीका केली होती. या वादावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्मिक भाष्य केले आहे. ट्विटमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणतात की, ‘संविधानाच्या पहिल्या कलमाशी खेळून भाजप-आरएसएसने #IndiaAliance ला मुर्खात काढले आहे,’ असेही आंबेडकर म्हणाले.
हे सुद्धा वाचा
निजामकालीन नोंदी असतील तरच मिळणार कुणबी दाखले; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
भाजपा नेत्यांच्या कारखान्यांना वाचवण्यासाठी सरकार उदार झाले, अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचे चेकमेट
ठाण्यातील मेट्रोचा मार्ग सीएमने क्लियर केला

‘घटनेच्या कलम 1 मध्ये असे नमूद केले आहे की, India, म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल. #INDIA आणि #BHARAT दोन्ही या कलमात येतात. प्रथमतः India का वापरला गेला हे सांगण्याऐवजी ते भाजप-आरएसएसच्या हेतूवर हल्ला करत आहेत. भाजप-आरएसएसला हेच हवे आहे आणि इथेच INDIA हरला आहे, कारण हा भाजप-आरएसएसचाच अजेंडा आहे. तो अजेंडा म्हणजे या प्रकारच्या परिस्थितींवर मात करण्यासाठी INDIA आघाडीत रणनीतीचा अभाव तसेच कल्पकता आणि ज्ञानाची दिवाळखोरी आहे हे मतदारांना दाखवणे.’ असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांची  काही वक्तव्ये ही अनाकलनीय असतात. ही वक्तव्ये कधी कधी भाजपला फायदेशीर ठरतात, असा कॉंग्रेस आरोप करते.  त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतात. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी फार्मात असताना आंबेडकर यांनी जरासे नमते घेतले असते तर विधीमंडळात वंचितचे आमदार असते, असे राजकीय जाणकरांचे याबाबतचे आकलन आहे. दरम्यान, देशात सध्या इंडिया आघाडीचे वातावरण असताना प्रकाश आंबेडकर यांना कॉंग्रेस प्रतिवाद कसा करते हे पहावे लागणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी