31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंच्या जनता दरबारला तुडुंब गर्दी !

धनंजय मुंडेंच्या जनता दरबारला तुडुंब गर्दी !

धनंजय मुंडे यांच्या जनता दरबारात तात्काळ आपले काम मार्गी लागते, या विश्वासाने जनता दरबार उपक्रमास नेहमी गर्दी झाल्याचे पहावयास मिळते. आज अंबाजोगाई शहरात देखील अशीच गर्दी व कामांचा धडाका पहावयास मिळाला. अंबाजोगाई येथील पंचायत समिती सभागृहात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज घेतलेल्या जनता दरबाराला हजारो नागरिकांनी तसेच मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आपले प्रश्न, समस्या व कामे यासंदर्भात मागणी केली. य़ावेळी अनेकांची कामे तात्काळ जागच्या जागीच मार्गी लावण्यात आली.

यावेळी बबन भैय्या लोमटे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या केज विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. धनंजय मुंडे यांनी कृषि खात्याचा कार्यभार हाती घेतल्यापासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात त्यांनी शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतला. प्रत्यक्ष बांधावर जावून देखील त्यांनी शेतकऱ्यांचे नुकासान पाहिले. यंदा पाऊस कमी असल्याने पिके करपून गेल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मुंडे यांनी प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले आहेत.

धनंजय मुंडे बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी जनता दरबार घेतला. यावेळी मुंडे अनेकांचे प्रश्न, अडीअडचणी समजावून घेत अनेकांची कामे देखील त्यांनी मार्गी लावली. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी धनंजय मुंडे नेहमीच तत्त्पर असल्याची प्रचिती आज देखील नागरिकांना आली. मतदारसंघातील प्रश्न असो की राज्यातील धनंजय मुंडे हे नेहमीच त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात. गरजू, विंचित नागरिक, शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी ते कायमच अग्रक्रम देत असतात.

हे सुद्धा वाचा 
35 हजारांची लाच घेताना एसीबीने जात पडताळणी कार्यालयाच्या कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले
सरकारमध्ये धनगर समाजाचे चार आमदार; त्यांनी समाजाची बाजू मांडावी : राजूशेठ जानकर
दलित महिलेला विवस्त्र करुन सावकाराने तोंडावर केली लघवी; 1400 रुपयांच्या कर्जाचा वाद

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी, दत्ता आबा पाटील, विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, बबन भैय्या लोमटे, शिवाजी सिरसाट, ऍड. विष्णुपंत सोळंके, विलास काका सोनवणे, विलास बापू मोरे, तालुकाध्यक्ष तानाजी देशमुख, वसंत कदम, विश्वांभर फड, अजित गरड, आबा पांडे, धर्मराज पाटील, गुणवंत आगळे, राजाभाऊ औताडे, माऊली औताडे, रावसाहेब यादव, अविनाश उगले, पांडुतात्या हारे, मुस्ताक पटेल, लक्ष्मण पवार, बंडू शिंदे यांसह परळी व केज मतदारसंघातील पदाधिकारी, बाजार समितीचे संचालक, विविध गावचे सरपंच, सेवा सहकारी सोसाटीचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, खरेदी विक्री संघचे संचालक व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी