28 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमहाराष्ट्रसरकारमध्ये धनगर समाजाचे चार आमदार; त्यांनी समाजाची बाजू मांडावी : राजूशेठ जानकर

सरकारमध्ये धनगर समाजाचे चार आमदार; त्यांनी समाजाची बाजू मांडावी : राजूशेठ जानकर

2014 साली आम्ही बारामतीमधील आंदोलनात सहभागी होतो. त्यावेळी सत्तातंर झाल्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षण देण्याचे आश्वासन दिले गेले होते. मात्र त्यानंतर कितीतरी कॅबिनेट बैठका झाल्या. परंतु धनगर समाजाला आरक्षण देण्यात आले नाही. आताही सरकारमध्ये आपले चार आमदार आहेत. त्यांनी धनगर आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरावे. त्यांनी सरकारची बाजू मांडू नये. त्या लोकप्रतिनिधींनी समाजाची बाजू मांडल्यास धनगर समाज तुम्हाला डोक्यावर घेईल, असे धनगर समाजाचे नेते राजूशेठ जानकर म्हणाले.

धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी आणि चौंडी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी खानापूर तालुका धनगर समाज आरक्षण कृती समिती आणि खानापूर तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाचे नेते राजूशेठ जानकर यांच्या नेतृत्वाखाली विटा तहसील कार्यालयावर जोरदार एल्गार मोर्चा काढला. सरकारने त्यांचे म्हणणे ऐकल्यास धनगर आरक्षणासाठी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करु. जोपर्यंत धनगर समाजाला एस.टी. प्रवर्ग आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत रस्त्यावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

“येळकोट येळकोट जय मल्हार”, “आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे”, “कोण म्हणतंय देत नाय घेतल्याशिवाय राहत नाही”, “लढा धनगर आरक्षणाचा लढा आमच्या हक्काचा” अशी जोरदार घोषणाबाजी करत भंडाऱ्याची उधळण करत जोरदार आंदोलन करण्यात आले. धनगर आरक्षण लागू करण्याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास सरकारला आमची ताकद दाखवू, असा इशाराही धनगर समाजाचे नेते राजूशेठ जानकर यांनी दिला.

धनगर आरक्षणासाठी आक्रमक बनलेल्या खानापूर तालुक्यातील धनगर समाजबांधवांनी आज सोमवारी सकाळी 11 वाजता बिरोबा मंदिरापासून मोर्चास सुरवात केली. “येळकोट येळकोट जय मल्हार”, “आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे”, “कोण म्हणतंय देत नाय घेतल्याशिवाय राहत नाही”, “लढा धनगर आरक्षणाचा लढा आमच्या हक्काचा” अशी जोरदार घोषणाबाजी करत भंडाऱ्याची उधळण करत धनगरी ढोल कैताळाच्या निनादात हा मोर्चा बिरोबा मंदिर ते प्रसाद चित्रमंदिर कॉर्नरमार्गे संगम मेडिकल कॉर्नर, मायणी रस्ता, पाटील पेट्रोल पंप कॉर्नर, चौंडेश्वरी चौक मार्गे हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आला. त्याठिकाणी मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी परमेश्वर कोळेकर, संजय विभूते, संग्राम पाटील, गजानन सुतार, संदीप ठोंबरे, संग्राम माने यांची भाषणे झाली.

या मोर्चामध्ये भाऊसाहेब पाटील, शिवाजी हारुगडे, भरत लेंगरे, किसन जानकर, सुनील मेटकरी, प्रताप कचरे, बाळासाहेब मेटकरी, संदीप मेटकरी, सागर पाटील, पै. राहुल रुपनर, तेजस लेंगरे, बंडू कातुरे, शशिकांत तरंगे, सुभाष मेटकरी, युवराज मेटकरी, सूर्यकांत मेटकरी, रवींद्र ठोंबरे, संजय पाटील, अधिक धडस, शंकर पाटील, दिलीप काळेबाग यांच्यासह समाजबांधव व महिला या सहभागी झाल्या होत्या.

हे सुद्धा वाचा 
दलित महिलेला विवस्त्र करुन सावकाराने तोंडावर केली लघवी; 1400 रुपयांच्या कर्जाचा वाद
भेसळखोरांनो, तुमचे दिवस भरले… मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी उगारला आसूड !
धनगर आरक्षणाबाबतचे पत्र घेऊन गिरीष महाजन सकाळी चौंडीला जाणार

विट्यात अवतरले पिवळे वादळ
धनगरी ढोलाच्या निनादात आणि घोषणाबाजीने आंदोलकांनी विटा शहरासह छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून सोडला. या आंदोलनादरम्यान काहीकाळ पावसाच्या मोठ्या सरी पडल्या. मात्र भरपावसात आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलक ठामपणे बसून होते. त्यामुळे विट्यात पिवळे वादळ अवतरल्याचे चित्र होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी