33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमनोरंजनयुट्युबर एल्विश यादव एकनाथ शिंदेंच्या घरी, जितेंद्र आव्हाड भडकले..

युट्युबर एल्विश यादव एकनाथ शिंदेंच्या घरी, जितेंद्र आव्हाड भडकले..

देशभरात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. आबालवृद्धांचा लाडका उत्सव असलेल्या या गणेशोत्सवात सामान्य लोकांपासून ते राजकीय नेते, बॉलीवुड सेलिब्रिटीज यांचाही उत्साह शिगेला पोहोचला आहे. गणपती उत्सवादरम्यान नातेवाईक. मित्र परिवाराच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. अनेक मोठमोठे राजकीय नेते तसेच बॉलीवुड कलाकार ही प्रथा जोपासताना दिसतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी ही गणेशाचे आगमन झाले आहे. अनेक बड्याबड्या नेत्यांपासून ते कलाविश्वातील दिग्गज लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले आहे. रविवारी, (24 सप्टेंबर) अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी भेट देऊन मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले.

अशातच, युट्युबर आणि बिग बॉस या रिअलिटी शोचा विजेता एल्विश यादव यानेही मुख्यमंत्री शिंदेंच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले आहे. एल्विश यादवने यावेळी बाप्पाचे आरती देखील केली. यामुळे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच भडकले असून त्यांनी यासंबंधी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

राष्ट्रवादी कॉँग्रेस चे आमदार जितेंद्र आव्हाड यांना युट्युबर एल्विश यादवचे मुख्यमंत्र्यांच्या घरी जाणे अजिबात पटलेले दिसत नाही. आव्हाड यांनी ट्विट करून म्हंटले, “एल्विश यादव सारख्या कृप्रसिद्ध युट्युबर आणि सो कॉल्ड सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर ला या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या शासकीय निवासस्थानी,गणेश आरतीसाठी बोलवत असतील,तर तो या पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान आहे.”

“महिलांच्या बाबतीत अतिशय खालच्या स्तरावर जाऊन या माणसाने अनेक स्टेटमेंट दिले आहेत.याच्या मते, स्त्रियांना मेंदू कमी असतो, बाई ही फक्त चूल आणि मुलं सांभाळण्यासाठीच असते. तिने तेवढंच करावं,” आव्हाड पुढे म्हणाले.

“हा प्रकार म्हणजे सरळ सरळ फुले दाम्पत्य, शाहू महाराज, आंबेडकर साहेब यांच्यासारख्या महान विभूतींनी स्त्रियांच्या उद्धराच जे कार्य केलं आहे त्याचा अपमान आहे.पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी ही घटना आहे.” आव्हाड म्हणाले.


कोण आहे एल्विश यादव?

एल्विश यादव हा एक प्रसिद्ध भारतीय यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता आहे. तो एप्रिल 2016 पासून युट्यूबवर हिंदी भाषेतील कॉमेडी व्हिडिओ बनवत आहे. त्याचे दोन यूट्यूब चॅनेल्स असून त्यांच्या दोन्ही चॅनेलवर एकूण 2.87 कोटी सबस्क्रायबर्स आहेत.

हे ही वाचा 

सलमान-शाहरुखची बाप्पाच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदेंच्या घरी हजेरी

बोहल्यावर चढली अन् परिणीती चोप्राची चढ्ढा झाली

3 इडियट्स फेम अभिनेत्याचा इमारतीवरून पडून मृत्यू

एल्विश यादवने 2016 साली त्याचे यूट्यूब चॅनल तयार करून त्याच्या यूट्यूब करिअरची सुरुवात केली. आज त्याच्या दोन्ही यूट्यूब चॅनेलवर त्याचे 20 मिलियन्सहुन अधिक सबस्क्रायबर्स आहेत. एल्विश यादवचे यूट्यूब वर ‘Elvish Yadav’ आणि ‘Elvish Yadav Vlogs’ नावाचे दोन चॅनेल आहेत, ज्यामध्ये त्याचे प्रत्येकी 13.8 मिलियन आणि 7.07 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत.

13 जुलै 2023 रोजी, त्याने बिग बॉस ओटीटी 2 या शो मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला. आणि 14 ऑगस्ट 2023 रोजी, तो बिग बॉस ओटीटी 2 फायनल जिंकला. एल्विश यादव यांची सोशल साइटवर चांगली फॅन फॉलोअर्स आहे, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही एल्विशचे बिग बॉस ओटीटीचा विजेता झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता.

कट्टर हिंदुत्ववादी म्हणुन ओळख असलेल्या तसेच भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खंदा समर्थक असलेला एल्विशआतापर्यंत अनेक वादविवादात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील G20 परिषदेच्या वेळी लावण्यात आलेल्या रोपांच्या कुंड्यांची चोरी करण्याचा आरोप एल्विशवर  झाला होता. त्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरीही चोरीसाठी त्याच्या गाडीचा वापर करण्यात आला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी