33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeक्राईमईडीने केली हवाला ऑपरेटरची 4 कोटींची मालमत्ता जप्त

ईडीने केली हवाला ऑपरेटरची 4 कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई ईडीने एक मोठी कारवाई केली आहे. हवालाचा व्यवहार करणाऱ्या दीपक कुमार जैन याची 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. दीपक जैन याने 518 कोटी रुपयांचा हवाला केला होता.या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

दीपक जैन यांच्या विरोधात हवाला बाबत गुन्हा दाखल झाला होता.हा गुन्हा मुंबई पोलिसांनी 2015 सालात दाखल केला होता. हाँगकाँग येथे स्टार ग्रेस लिमिटेड नावाची कंपनी आहे.या कंपनी शी बोगस व्यवहार दाखवून 2015 सालात सुमारे 518 कोटी रुपये पाठवण्यात आले होते. याबाबत नंतर गुन्हा दाखल झाला होता. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केला होता.

हा गुन्हा ईडीने आपल्याकडे घेऊन तपास सुरू केला होता.या गुन्ह्यात ईडीने दीपक जैन याला अनेक समन्स पाठवून चौकशीसाठी हजर रहाण्यास सांगितलं होतं.मात्र, दीपक जैन काही चौकशीला हजर राहत नव्हता.या दरम्यान ईडीने अनेक कारवाया केल्या.दीपक जैन वर्ष फरार होता.त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीस ही बजावण्यात आली होती.तो फेब्रुवारी 2023 मध्ये भारतात परतला असता त्याला एअरपोर्टवर अटक करण्यात आली. तेव्हा पासून तो तुरुंगात आहे.

हे सुद्धा वाचा 

भर पावसात राहुल गांधी गरजले; म्हणाले भाजपला केवळ 40 जागा मिळणार

बारसूमध्ये जनरल डायरच्या अवलादी; शिंदे-फडणवीस सरकारची मोगलाई

हनुमान चालीसा प्रकरण : राणा दाम्पत्याना कोर्टाने फटकारले

आता त्याची मालमत्ता शोधण्याच काम ईडीचे अधिकारी करत आहेत.त्यांना त्याची मालमत्ता सापडली , त्याच प्रमाणे त्याच्या बँक खात्यात ही मोठी रक्कम होती.हे सर्व ईडीने जप्त केले आहे.अजूनही त्याची मालमत्ता शोधण्याचा काम सुरू आहे.दीपक जैन हा मुंबईतील एक मोठा हवाला ऑपरेटर आहे.त्याने आणखी कोणाला कोट्यवधी रुपये हवाला केलेत का , याचा तपास ही सुरू आहे.

ED seizes assets of Hawala operator worth Rs 4 cr

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी