33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeव्हिडीओबारसूमध्ये जनरल डायरच्या अवलादी; शिंदे-फडणवीस सरकारची मोगलाई

बारसूमध्ये जनरल डायरच्या अवलादी; शिंदे-फडणवीस सरकारची मोगलाई

कोकणची भूमी आज अशांत, अस्वस्थ आहे. तरीही कधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुटीवर जात आहेत तर आता वातावरण पेटलेले असताना कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशवारीवर निघाले आहेत. तिकडे मॉरिशसमध्ये फडणवीस शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करत आहेत आणि इकडे शिवरायांचे नाव घेऊन सत्तेत आलेले, जनतेचे सरकार म्हणविणारे आपल्याच लोकांची डोकी फोडत आहेत. 

कोकणची भूमी आज अशांत, अस्वस्थ आहे. कारण रत्नागिरी जिल्ह्यातील बारसूमध्ये जनरल डायरच्या अवलादी निपाजल्या आहेत. तिथे शिंदे-फडणवीस सरकारची मोगलाई सुरू आहे. कधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुटीवर जात आहेत तर आता वातावरण पेटलेले असताना कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशवारीवर निघाले आहेत. तिकडे मॉरिशसमध्ये फडणवीस शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करत आहेत आणि इकडे शिवरायांचे नाव घेऊन सत्तेत आलेले, जनतेचे सरकार म्हणविणारे आपल्याच लोकांची डोकी फोडत आहेत.

 

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे शिंदे-फडणवीस सरकार ऑईल रिफायनरी प्रकल्प उभारण्यासाठी स्थानिकांवर बळजबरी करत आहे. स्थानिकांनी प्रकल्पाला विरोध करत सरकारविरोधात जनआंदोलन उभारले आहे. सरकारच्या दमनकारी नीतिविरोधात स्थानिक जनता आक्रमक झाली आहे. मात्र, तरीही शिंदे-फडणवीस सरकार हा प्रकल्प रेटण्याच्या भूमिकेत दिसत आहे. सध्या बारसूच्या पार्श्वभूमीवर जे काही सुरु आहे, त्याबाबत लय भारीचे संपादक विक्रांत पाटील आणि कार्यकारी संपादक सुधाकर काश्यप यांची सविस्तर चर्चा या व्हिडीओतून पाहू शकता.

बारसूमध्ये रिफायनरी विरोधात स्थानिक जनता एकवटली आहे. माती सर्वेक्षण उधळून लावणाऱ्या 111 स्थानिक आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. तरीही कोंकणी जनतेचा निर्धार कायम आहे. महिला अत्यंत आक्रमक आहेत.
बारसूमध्ये रिफायनरी विरोधात स्थानिक जनता एकवटली आहे. माती सर्वेक्षण उधळून लावणाऱ्या 111 स्थानिक आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. तरीही कोंकणी जनतेचा निर्धार कायम आहे. महिला अत्यंत आक्रमक आहेत. (फोटो क्रेडिट : रेडिफ / गुगल)

हे सुद्धा वाचा :

बारसू रिफायनरी प्रकरण: आंदोलन चिघळलं! पोलिसांची कोकणवासियांना अमानुष मारहाण; पाहा व्हिडिओ

बारसू रिफायनरी प्रकल्प: कोकणात जनआंदोलन पेटणार! वाचा नेमकं प्रकरण

बारसू प्रकल्पाबाबत चर्चेतून मार्ग काढा; शरद पवारांचा उदय सामंतांना सल्ला

barsumadhye general dayarachya avaladi, barsu, shinde fadnavis sarakarachi moglai, sarakarachi moglai, shinde fadnavis sarakar

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी