30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयआम आदमी पक्षाचं उद्या आत्मक्लेश आंदोलन ,२०० कार्यकर्ते दिवसभर मैदानात बसणार

आम आदमी पक्षाचं उद्या आत्मक्लेश आंदोलन ,२०० कार्यकर्ते दिवसभर मैदानात बसणार

आम आदमी पक्षाचं उद्या आत्मक्लेश आंदोलन
२०० कार्यकर्ते दिवसभर मैदानात बसणार

Aam Aadmi Party’s protest tomorrow
200 activists will sit in the field throughout the day

खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या वेळी उष्माघाताने 14 जनांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत आम आदमी पक्षाच्या वतीने कार्यक्रमाच्या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे.हे आंदोलन उद्या घटनेच्याच ठिकाणी दिवसभर करण्यात येणार आहे.

खारघर येथील मैदानात 16 एप्रिल रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला.हा पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. यावेळी धर्माधिकारी यांचे लाखो अनुयायी कार्यक्रमाला आले होते.त्यादिवशी कडक ऊन आसल्याने 14 जा जनांचा उष्माघाताने मृत्यू झाला.याबाबत आम आदमी पक्षाने कारवाईची मागणी केली आहे.जबाबदार व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.मात्र मागणी मान्य होत नसल्याने आता त्यांनी आत्मक्लेश आंदोलन झेडल आहे.उद्या आप पक्षाचे सुमारे 200 कार्यकर्ते ज्या मैदानात कार्यक्रम झाला तिथेच उन्हात बसणार आहेत. आणि आत्मक्लेश करणार असल्याच आप पक्षाचे सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी सांगितलं.

आम आदमी पक्षाने या प्रकरणात कोर्टात धाव घेतली आहे.पक्षाने फौजदारी संहिता 1973 नुसार कोर्टात कलम 156(3) नुसार अर्ज केला आहे.हा अर्ज स्थानिक पनवेल कोर्टात केला आहे.

हे देखिल वाचा

ईडीने केली हवाला ऑपरेटरची 4 कोटींची मालमत्ता जप्त

भर पावसात राहुल गांधी गरजले; म्हणाले भाजपला केवळ 40 जागा मिळणार

रिफायनरीला 70% शेतकऱ्यांचा पाठिंबा! कुठलाही लाठीचार्ज झाला नाही; मुख्यमंत्र्यांचा दावा

या अर्जात आयोजक यांच्यावर भादवी कलम 304,308 , 336 , 337,338 आणि 114 कारवाई करण्याचे पोलिसाना आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. या अर्जावर पनवेल कोर्टात लवकरच सुनावणी होणार असल्याच, आम आदमी पक्षाचे राज्याचे सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी सांगितलं.

Aam Aadmi Party’s protest tomorrow
200 activists will sit in the field throughout the day

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी