31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
HomeमुंबईFree Treatment for Patients: मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने मोफत आरोग्य...

Free Treatment for Patients: मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने मोफत आरोग्य सेवा !

महाराष्ट्र सरकारच्या पुढाकारामुळे बाळासाहेब ठाकरे दवाखाना आणि पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून 2 ऑक्टोबरपासून मुंबईकरांना मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत, मुंबईमध्ये एकूण 227 आरोग्य केंद्रे उभारण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या मुलाखती आणि भाषणांमधून अनेकदा शिवसेना (Shivsena) पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे त्यांचे दैवत आणि प्रेरणास्थान असल्याचे नमूद केले आहे. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक नवनवीन योजनांना सुरूवात केली आहे. त्यामध्ये भर घालत मुख्यमंत्री शिंदेंनी मंगळवारी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरें यांच्या स्मरणार्थ एका महत्त्वाकांक्षी योजनेची सुरूवात करून मुंबईकरांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकारामुळे बाळासाहेब ठाकरे दवाखाना आणि पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून 2 ऑक्टोबरपासून मुंबईकरांना मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत, मुंबईमध्ये एकूण 227 आरोग्य केंद्रे उभारण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 50 आरोग्य केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहयाद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमामध्ये दिली. सदर आरोग्य केंद्रामध्ये सुमारे 139 वैदयकीय चाचण्या मोफत करण्यात येणार आहे, ज्याचा लाभ सामान्य मुंबईकरांना घेता येईल.

झोपडपट्टीभागात‍ वास्तव्यास असलेल्या‍ आणि आर्थिकदृष्टया कम‍कुवत असलेल्या जनतेला चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने मोबाईल मेडिकल युनिटची संख्या वाढवावी आणि मॅमोग्राफीसाठी देखील मोबाईल व्हॅन सुरू कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यानी संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या योजनेचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले की, मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हे क्लिनिक आणि पॉलिक्लिनिक चालविण्यात येणार आहे. पोर्टकॅबिन आणि पक्के बांधकाम अशा दोन स्वरूपात ही आरोग्य केंद्रे चालविण्यात येणार आहे.

सध्या 50 ठिकाणी आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये 227 आरोग्य केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये 34 पॉलिक्लिनिक आरोग्य केंद्राचा समावेश आहेत. या आरोग्य केंद्रांमध्ये विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांची सेवा मिळणार असल्याची माहिती देण्यात आली.

हे सुद्धा वाचा –

Lumpy Skin Disease: लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येक जिल्हयाला १ कोटींची मदत जाहीर

RTO forms special teams : छोटया अंतराचे भाडे नाकारण्याऱ्या टॅक्सी चालकांची आता खैर नाही !

Raju Shetti : राजू शेट्टी यांनी दंड थोपटले

 

या योजनेचे सादरीकरण मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी केले. त्याबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, या आरोग्य केंद्रांमध्ये एक एम. बी. बी. एस. डॉक्टर, परिचारिका, औषधनिर्माता, आणि बहुउद्देशीय कामगार असे मनुष्यबळ असेल. सकाळी 7 ते दुपारी 2 आणि दुपारी 3 ते रात्री 10 या वेळेत रुग्णांच्या सोयीनुसार, दोन सत्रात या दवाखान्याची वेळ असणार आहे.

साधारणपणे २५ ते ३० हजार लोकसंख्येकरीता एक याप्रमाणे ही आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांची नोंदणी करण्यात येणार आहे.

मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये लोकसंख्येचे प्रमाण अधिक असते आणि त्याचा ताण शहरातील सरकारी रूग्णालये आणि महानगरपालिकेतर्फे चालवण्यात येणाऱ्या रूग्णालयांवर स्पष्टपणे दिसून येतो. मागील दोन वर्षे कोरोनाच्या साथीने संपूर्ण देशात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातले होते. त्यावेळी महराष्ट्रातील आण‍ि विशेषत: मुंबईच्या आरोग्य यंत्रणेवर त्याचा खूप परिणाम झाला होता. परंतु मुंबई महानगर पालिकेने केलेल्या चांगल्या व्यवस्थापनामुळे परिस्थिती जास्त चिघळली नाही.

भविष्यामध्ये जर अशा प्रकारची वैदयकीय आणीबाणी सदृश परिस्थिती पुन्हा उद्यभवली तर आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम बनविण्याची गरज असल्याचा प्रत्यय आला आहे. त्या अनुशंघाने सध्याच्या शिंदे सरकारने उचललेले पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यामुळे मुंबईतील गोरगरीब जनतेला नक्कीच लाभ होईल, असे काही मुबंईकरांनी मत व्यक्त केले आहे.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी