28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रनीट परीक्षा या वर्षी एकदाच होणार : केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल

नीट परीक्षा या वर्षी एकदाच होणार : केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल

टीम लय भारी

मुंबई :-  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी कडक निर्बंध करण्यात आले आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणार नॅशनल एलिजिबीलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात नीट (NEET) परीक्षा २०२१ मध्ये एकदाच होणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी ही माहिती दिली. पोखरियाल यांनी संसदेला दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत ही परीक्षा आयोजित केली जाते.

नीट (NEET) (UG) परीक्षा रविवार, १ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे. इंग्रजी आणि हिंदीसह ११ भाषांमध्ये पेन-पेपर पद्धतीने म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. MBBS, BDS, BAMS, BSMS, BUMS आणि BHMS अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नीट यूजी परीक्षा घेतली जाते.

जेईई मेन २०२१ परीक्षा यंदा चार सत्रात आयोजित केली जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नीट परीक्षेबाबतही उत्सुकता होती. जेईई मेन प्रमाणेच नीट परीक्षेचे आयोजन एकापेक्षा अधिक वेळा होणार आहे का, असा प्रश्न विद्यार्थी विचारत होते. परंतु शिक्षणमंत्र्यांनी ही शक्यता यंदा पुरती तरी फेटाळून लावली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी