26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्ररुग्णसंख्या वाढली की जनतेवर ढकलायचं आणि कमी झाली की... मनसेचा टोला

रुग्णसंख्या वाढली की जनतेवर ढकलायचं आणि कमी झाली की… मनसेचा टोला

टीम लय भारी

मुंबई :-  मुंबईपाठोपाठ राज्यातील रुग्णाचा आकडा महिनाभराच्या लॉकडाऊनंतर कमी होताना दिसत आहे. राज्यात सोमवारच्या आकडेवारीत रुग्णसंख्येपेक्षा (Number of patients) कोरोनावार (Corona) मात करून घरी परतलेल्या रुग्णांची संख्या (Number of patients) दुप्पट होती. परंतु, करोनाच्या यश-अपयशावरून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे सरकारला टोला लगावला आहे(Maharashtra Navnirman Sena has attacked the Thackeray government).

कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर राज्य सरकारने लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला होता. लॉकडाउनचे परिणाम आता दिसून येत असून, रुग्णसंख्येत (Number of patients) घट होताना दिसत आहे. मुंबईतील परिस्थितीही नियंत्रणात आलेली असून, मुंबई मॉडेलचे कौतुक होत आहे. मुंबई आणि राज्यातील परिस्थितीवर समाधान व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी सवाल उपस्थित केला आहे (Expressing satisfaction over the situation in Mumbai and the state, Maharashtra Navnirman Sena leader Sandeep Deshpande has raised questions).

जागतिक पातळीवरुन लस खरेदी करणार, BMC चा पुढाकार; आदित्य ठाकरे मैदानात

कोरोनाच्या औषधे आणि लसीवर जीएसटी रद्द केला तर, किंमत वाढेल: निर्मला सीतारामन

India’s eight poorest states may have to spend 30% of their health budgets on Covid-19 vaccines

संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विट केले असून, या ट्विटमध्ये कोरोना (Corona) परिस्थितीवरून सरकारला लक्ष्य केले आहे. “आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या (Number of patients) कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे त्याच श्रेय मुंबई मॉडेल, मुख्यमंत्री, पालकमंत्री सगळेच घेत आहेत. म्हणजे रुग्ण संख्या (Number of patients) वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश, अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यमे कशी घेऊ शकतात?,” असे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी म्हटले आहे.

राज्यातील परिस्थिती कशी आहे?

राज्यात सोमवारी दिवसभरात रुग्णसंख्येत (Number of patients) मोठी घट झाली. राज्यात ३७ हजार ३२६ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ही गेल्या काही आठवड्यांतील ही सर्वात निच्चांकी रुग्णसंख्या (Number of patients) ठरली आहे. विशेष म्हणजे सोमवारी ६१ हजार ६०७ रुग्ण कोरोनावर (Corona) मात करून घरी परतले. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या (Number of patients) कमी होऊन रिकव्हरी रेट ८७ टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. आतापर्यंत कोरोनाच्या २ कोटी ९६ लाख ३१ हजार १२७ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यातील ५१ लाख ३८ हजार ९७३ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी