33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रसह 'या' ८ राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

महाराष्ट्रसह ‘या’ ८ राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

टीम लय भारी

मुंबई :- देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि पंजाब या राज्यांसह आठ राज्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. एका दिवसात समोर आलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीत ६८ हजार ०२० रुग्णांपैकी ८४.५ टक्के रुग्ण या राज्यांमधील आहेत.

भारतात सहा कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. मंत्रालयाने सांगितले की, भारतात ६ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. गेल्या एका दिवसांत महाराष्ट्रात ४० हजार ४१४ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कर्नाटकात ३  हजार ०८२, पंजाबमध्ये २  हजार ८७०, मध्य प्रदेशात २  हजार २७६, केरळमध्ये २ हजार २१६, तामिळनाडूमध्ये २  हजार १९४  आणि छत्तीसगढमध्ये २  हजार १५३  नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात गेल्या एका दिवसात समोर आलेल्या ६८ हजार ०२० कोरोना बाधितांपैकी ८४.५  टक्के रुग्ण हे कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या आठ राज्यांमधील आहेत.

सध्या ५ लाख २१ हजार ८०८ रुग्णांवर उपचार सुरु  

देशात सध्या ५  लाख २१ हजार ८०८  कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या उपचार घेत असलेल्या एकूण  कोरोना बाधित रुग्णांपैकी ८०.१७  टक्के रुग्ण महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक आणि छत्तीसगढमधील आहेत. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोना लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या सहा कोटींहून अधिक झाली आहे. सकाळी सात वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, ९,९२,४८३ सत्रांमध्ये लसीचे ६,०५,३०,४३५ डोस देण्यात आले आहेत. यापैकी ८१,५६,९९७ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, ५१,७८,०६५ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त फ्रंट लाईन वर्कर्स म्हणून तैनात असलेल्या ८९,१२,११३  कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला असून ३६,९२,१३६ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

दरम्यान, पहिल्यापासून इतर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या ६७,३१,२२३ लाभार्थ्यांच्या वतीने २,७८,५९,९०१ ज्येष्ठ नागरिकांनाही लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी