28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रInnovative venture of Satej Patil : राज्यमंत्री सतेज पाटील यांचा अभिनव उपक्रम,...

Innovative venture of Satej Patil : राज्यमंत्री सतेज पाटील यांचा अभिनव उपक्रम, युवकांना रोजगार देण्यासाठी पुढाकार

प्रशांत चुयेकर : टीम लय भारी

कोल्हापूर : कोरोनामुळे जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक परप्रांतीय कामगार हे काम सोडून गेले आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात कामगार कसे मिळणार हा प्रश्न उद्योजकांसमोर निर्माण झाला आहे. तर अनेकांचे रोजगार गेल्यामुळे ते चिंतेत आहेत. हीच औद्योगिक क्षेत्रातील पोकळी भरून काढण्यासाठी आणि जिल्ह्यातील युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. ‘माझं कोल्हापूर माझा रोजगार’ या अभियानातून (Innovative venture of Satej Patil) रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. त्यासाठी नामदार पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन ‘माझं कोल्हापूर माझा रोजगार’ या अभियानाची घोषणा केली.

इचलकरंजीतून 23 हजार कामगार परत गेले. जिल्ह्यात एक लाख कामगारांची गरज भासणार असल्याने येथे हा उपक्रम (Innovative venture of Satej Patil) राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. इचलकरंजी एअरजेट असोसिएशनचे सतिश पाटील आणि शटललेस असोसिएशनचे अनिल गोयल यांनी पालकमंत्री म्हणून आपण जे पाऊल उचलले आहे हे महत्वाचे असल्याचे सांगितले. तर राजगोंडा पाटील यांनी यामुळं नक्कीच उद्योजक उभारी घेतील असा विश्वास व्यक्त केला. उद्योजक शामसुंदर मर्दा यांनी सध्या कापड बनविण्यात कामगारांचा मोठा तुटवडा भासतो.

आमदार ऋतुराज पाटील यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये औद्योगिक संस्थाच्या प्रतिनिधींनी आपले प्रश्न मांडले आहेत. कौशल्य विकास शिक्षणावर भर दिलाय. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असून लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच सकारात्मक प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.

आमदार चंद्रकांत जाधव यांनी कोरोनाच्या संकटाने अनेकांचे उद्योग बंद पडलेत. परप्रांतीय कामगार हे परत गेले आहेत. नामदार सतेज पाटील यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून काम करत आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपण आता चांगली सुरवात केली आहे. माझं कोल्हापूर माझा रोजगार ही संकल्पना घेऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. लवकरच जॉब फेअर घेऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. युवकांना मार्गदर्शन करून त्यांना नोकरीमध्ये सामावून घेऊ. यामध्ये उद्योजकांनीही पुढाकार घेऊन प्रयत्न करावेत. असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते माझं कोल्हापूर माझा रोजगार या अभियानाच्या लोगोचे अनावरण ऑनलाईन करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

Politics in Mantralaya : मंत्र्यांच्या पीएस, ओएसडींना सहा महिन्यांपासून पगारच नाहीत

चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ जनतेची माफी मागावी : काँग्रेस

मुंबई असुरक्षित राज्यकारभार नागपुरातून चालवा, ‘या’ काँग्रेस नेत्याची मागणी!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी