महाराष्ट्र

IPS अधिकारी वारकरी वेशात!

टीम लय भारी 

सोलापूर : आषाढी वारी जवळ येऊ लागली तशी वारकऱ्यांची पावले वेगाने पंढरपूरच्या दिशेने कूच करू लागली आहेत. आज पालखीचे तिसरे गोल रिंगण पार पडणार आहे. भक्तीमय रंगात भारून गेलेले असे हे वातावरण दरवर्षी सगळ्यांना आकर्षित करत असते. केवळ वारकरीच नव्हे तर नेते मंडळींसह बंदोबस्ताची देखरेख करणारा अधिकारी वर्ग सुद्धा या भक्तीमय गजरात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळतात. यावेळी पालखी सोहळ्यासाठी पोलिस अधिकारी महिलेने केलेल्या विशेष वेषभूषेचे कौतुक होत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील एसपी तेजस्वी सातपुते यांनी पोलीस गणवेशासह कपाळी गंध, डोक्यावर पांढरा फेटा आणि गळ्यात उपरणे असा वेश परिधान करून पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. विठूरायाच्या भक्तीचे हे असे अनोखे रूप यानिमित्ताने नेटकऱ्यांनी अनुभवला.

आपल्याच तोऱ्यात नेहमी वावरणारे आयपीएस अधिकारी सरकारी गाड्यांमध्येच फिरताना दिसतात. स्वतःच्या मिजासमध्ये राहणारे ह्या अधिकाऱ्यांचा क्वचित कधीतरी सर्वसामान्यांशी संपर्क येतो. परंतु यंदाच्या पालखी सोहळ्यात कितीतरी अधिकारी, पोलिस कर्मचारी आपली पोस्ट, आपली महानता सारंच विसरून यावेळी सर्वसामान्यांमध्ये मिसळताना दिसले. वारकऱ्यांमध्ये एक होत भक्तीरंगात न्हाऊन निघाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, पोलिस अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी सुद्धा न राहवून आपला वारकरी वेशातील फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे, ज्याला हजारो लोकांनी लाईक्सचा पाऊस पाडून त्यांचे कौतुक केले आहे.

हे सुद्धा वाचा…

VIDEO : एकनाथ शिंदेंची ‘बहुत झाली बदनामी,’ चेहरा उजळविण्यासाठी आता फिरताहेत गल्लोगली

राजीनामा सत्राने शिवसेना हादरली

खबरदार! गुगलवर ‘हे’ सर्च करत असाल तर होणार कारवाई

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

नगरमधील या पट्ट्याने व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केले, आता गुऱ्हाळ व रसवंती धंदा जोरात चालवतोय

लोकसभा निवडणुकीचा(Loksabha Election 2024) तिसरा टप्पा लवकरच होवू घातला या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना…

46 mins ago

BMC देणार मुंबईतील या  चौकाला ‘श्रीदेवी कपूर’ चं नाव

  बॉलीवूडची हवाहवाई गर्ल, अभिनेत्री श्रीदेवी जिने ८०-९० चं दशक गाजवलं, चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.(BMC…

49 mins ago

काय झालं मोदींनी दिलेल्या गॅरंटीचं

२०२४ ची लोकसभा निवडणूक चौथ्या टप्प्यात पोहचली असून मागील तीन टप्प्याचे मतदान पाहता मतदारांनी कमी…

2 hours ago

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

19 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

19 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

21 hours ago