32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रराजीनामा सत्राने शिवसेना हादरली

राजीनामा सत्राने शिवसेना हादरली

टीम लय भारी

मुंबईः गेल्या पंधरा दिवसांमध्ये शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. शिवसेनेतील 40 आमदार एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभागी झाले. त्यामुळे शिवसेनेत मोठी प डझड झाली. तरीही बंडखोर शिवसैनिक आमची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आहे, असे ठासून सांगत आहेत. शिंदे भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होत आहेत. नुकताच प्रकाश पुजारी आणि कौस्तुभ म्हामणकर यांनी शाखा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.

प्रकाश पुजारी हे केतकी पाडा, दहिसर पूर्व शाखेचे शिवसेना शाखा प्रमुख आहेत. तसेच ओम साई महिला बचत गट आणि सिध्दी विनायक महिला उत्पादक गटाच्या अध्यक्षा सुषमा विष्णु गायकवाड यांनी राजीनामा दिला आहे. तसेच कौस्तुभ म्हामणकर यांनी देखील शाखा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. नवीन सरकार आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी शिवसेनेची पुर्नबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असलेल्या मुंबईत शिवसेनेला खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे.

नाराज शिवसैनिक, शाखा प्रमुख राजीनामा देत आहेत. दोन दिवसांपूर्वी मागाठाणे विभागातील दोन शाखा प्रमुखांनी राजीनामा दिला होता. आता दहिसर शाखा नंबर 3 चे शाखा प्रमुख प्रकाश सुर्वे आणि शाखा नंबर 12 चे शाखा प्रमुख कौस्तुभ म्हामणकर यांनी दिली आहे. महिला शाखा संघटक सुषमा गायकवाड यांनीही पदाचा राजीनामा दिला. शिवसेना विभाग प्रमुख विलास पोतनीस यांना प्रकाश पुजारी यांनी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे. की, गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या राजकीय घडामोडी आणि ठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याशी असलेले माझे घनिष्ठ संबंध पाहता प्रभागील पदाधिकारी व शिवसैनिक संशयाने पाहत आहेत.

त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. चुकीचे संदेश पोहोचवत आहेत. मी कारणाने शाखा प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. ठाणे मतदार संघातील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. प्रकाश पुजारी हे त्यांचे निकटवर्तीय आहेत. तर शिवसेनेला पुण्यातही मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील नगरसेवक नाना भानगिरे हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. भानगिरे हे पुणे महानगरपालिकेमध्ये तीन वेळा निवडून आले आहेत. त्यांनी तीन वेळा हडपसर मतदार संघातून निवडणूक लढवली होती.

हे सुध्दा वाचा:

विवेक प्रकाशनचे आगामी पुस्तक ‘अखंड भारत का आणि कसा‘?

राज्याला ‘संवेदनशील‘ मुख्यमंत्री लाभला – प्रवीण दरेकर

‘या’ जिल्ह्यात घेण्यात येणार ‘अग्निपथ’ सैन्य भरती मेळावा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी