28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणयेवा कोकण आपलास आसा; कोकणासाठी आणखी 52 गणपती स्पेशल ट्रेन!

येवा कोकण आपलास आसा; कोकणासाठी आणखी 52 गणपती स्पेशल ट्रेन!

गणपती आणि कोकण असे अनेक वर्षापासूनचे नाते आहे. पावसाळा सुरू झाल्यावर सगळ्यांना कोकणाचे वेध लागतात. मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोकणी माणूस राहतो. हा चाकरमानी मिळेल ते वाहन पकडून कोकणात गणपतीसाठी जातो. त्यानुसार मध्य रेल्वेनेही आखणी 52 गणपती विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, 52 गणपती विशेष गाड्यामध्ये दिवा-चिपळूण दरम्यान 36 मेमू स्पेशल आणि मुंबई-मंगळुरू दरम्यान 16 स्पेशल गाड्यांचा समावेश आहे. यंदा रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्याने चाकरमान्यांचा प्रवास विनासायास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आठवड्यापूर्वी मध्य रेल्वेने गणपती उत्सवासाठी 156 गणपती विशेष रेल्वे गाड्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता गणपती विशेष रेल्वे गाड्यांची 208 वर पोहचली आहे.

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार दिवा-चिपळूण मेमू विशेष 36 सेवा फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ट्रेन क्रमांक 01155 मेमू दिवा येथून 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर आणि 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत दररोज सायंकाळी 10.15 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दुपारी 1.25 वाजता चिपळूणला पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01156 मेमू चिपळूण येथून 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर ते 3ऑक्टोबर पर्यंत दररोज दुपारी 1 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता दिवा येथे पोहोचेल. या गाड्यांना पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी येथे थांबा देण्यात आला आहे.

मुंबई आणि मंगळुरू जंक्शन विशेष गाडीच्या 16 सेवा चालवण्यात येणार आहेत. ट्रेन क्रमांक 01165 स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 15 ते 18 सप्टेंबर, 22 ते 23 सप्टेंबर रोजी रात्री 10.15 वाजता सुटेल आणि मंगळुरु जंक्शन सायंकाळी 5.20 वाजता दुसऱ्या दिवशी पोहोचेल.तसेच ट्रेन क्रमांक 01166 स्पेशल मंगळुरु जंक्शन 16 ते 19 सप्टेंबर, 23-24 सप्टेंबर, 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला दुपारी 1.35 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल.

हे सुध्दा वाचा:

एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी पवारांचे आव्हाड यांना बळ; राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी, पक्ष प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड

मंत्रीमंडळात राष्ट्रवादीचे नऊ मंत्री; शिंदे गटात अस्वस्थता

राष्ट्रवादी भ्रष्ट पक्ष असेल तर त्याचे आमदार भाजपला कसे चालतात?; शरद पवार यांचा मोदी यांना सवाल

या गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा , मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड ब्यंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुरथकल आणि ठोकूर याठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. दरम्यान 52 गणपती विशेष गाड्याचे आरक्षण 3 जुलै रोजी भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर सुरू होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी