27 C
Mumbai
Tuesday, June 18, 2024
Homeमहाराष्ट्रUnlock 1.0 in Maharashtra : राज्यात ‘लॉकडाऊन’ शिथील, महाराष्ट्र सरकारचा ताजा आदेश...

Unlock 1.0 in Maharashtra : राज्यात ‘लॉकडाऊन’ शिथील, महाराष्ट्र सरकारचा ताजा आदेश जारी

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी राज्यातील पाचव्या ‘लॉकडाऊन’बाबतचा आदेश जारी केला आहे. या आदेशाद्वारे ‘मिशन बिगीन अगेन’ मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे. ( Maharashtra govt announced Mission Bigin Again campaign in Unlock 1.0 )  यात ‘कोरोना’बाधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी बहुतांश व्यवहार सुरळीत करण्याची परवानगी दिली आहे.

तब्बल 12 पानांचा हा आदेश आज (रविवारी) सायंकाळी जारी करण्यात आला आहे.

बाधित क्षेत्र वगळता इतर भागांमध्ये दुचाकी व चार चाकी वाहने, टॅक्सी परवानगी दिलेली आहे. यापूर्वी केवळ जिवनावश्यक वस्तुंच्या दुकानांनाच परवानगी होती. परंतु आता जिवनावश्यक नसलेल्या वस्तुंची दुकाने उघडण्यासही परवानगी देण्यात आली आहे ( Some activities permitted by govt of Maharashtra in Unlock 1.0 ) .

Unlock 1.0 in Maharashtra : राज्यात ‘लॉकडाऊन’ शिथील, महाराष्ट्र सरकारचा ताजा आदेश जारी Unlock 1.0 in Maharashtra : राज्यात ‘लॉकडाऊन’ शिथील, महाराष्ट्र सरकारचा ताजा आदेश जारी

Unlock 1.0 in Maharashtra : राज्यात ‘लॉकडाऊन’ शिथील, महाराष्ट्र सरकारचा ताजा आदेश जारी

Mission Bigin Again in Lockdown 5.0
राज्य सरकारने बरेच व्यवहार परत सुरळीत करण्याचे आदेश जारी केले आहेत.

Unlock 1.0 in Maharashtra : राज्यात ‘लॉकडाऊन’ शिथील, महाराष्ट्र सरकारचा ताजा आदेश जारी Unlock 1.0 in Maharashtra : राज्यात ‘लॉकडाऊन’ शिथील, महाराष्ट्र सरकारचा ताजा आदेश जारी Unlock 1.0 in Maharashtra : राज्यात ‘लॉकडाऊन’ शिथील, महाराष्ट्र सरकारचा ताजा आदेश जारी

खासगी व सरकारी कार्यालये मर्यादीत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू ठेवण्यासही परवानगी देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याच्या अंतर्गत बस वाहतूक करण्यासही परवानगी दिलेली आहे.

हे सुद्धा वाचा : Lockdown 5.0 : शरद पवारांच्या आग्रहामुळे उद्धव ठाकरेंकडून ‘लॉकडाऊन’ शिथील होण्याची शक्यता

हे व्यवहार सुरू करण्यासाठी 3 जून, 5 जून व 8 जून असे तीन टप्पे निश्चित केले आहेत.

धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये तूर्त बंदच राहणार आहेत. परिस्थितीचा अंदाज घेऊन ती सुरू करण्याबाबत सरकार नंतर निर्णय घेऊ शकते.

दुकाने, कार्यालये, टॅक्सी, बस या सर्वच ठिकाणी लोकांची संख्या मर्यादीत ठेवणे बंधनकारक आहे. सोशल डिस्टन्शिंगचे कसोशीने पालन करण्याच्या सुचना मुख्य सचिवांनी या आदेशात केल्या आहेत .

मॉल, हॉटेल, सलून व उपनगरीय रेल्वे सेवा मात्र बंदच राहणार आहेत.

पाहा कुठे काय सुरू राहणार, काय बंद होणार ?

Chief Secretary issued order Lockdown 5.0
काय बंद, काय सुरू ? पाहा या तक्त्यात

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी