महाराष्ट्र

Maharashtra Budget 2023: जलसंधारणासाठी शिंदे-फडणवीस सरकारच्या योजना वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी 2023-24 या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सरकारने अनेक तरतूदी समाविष्ठ केल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्परात सरकारकडून वीज आणि पाणी यांसारख्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी कोणकोणत्या नविन योजना आणि तरतूदी करण्यात आल्या आहेत याची संक्षिप्त माहिती या बातमीमार्फत जाणून घेऊ…

असे असतील नदीजोड प्रकल्प
– दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून
– नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्यांच्या उपखोर्‍यातील पाणी वापरणार
– मुंबई, गोदावरी खोर्‍यातील तूट भरून काढण्यासाठी पाणी वापरणार
– मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगावला लाभ
– वैनगंगा खोर्‍यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांना लाभ

तापी महापुनर्भरण प्रकल्प, कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प
– पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी तापी महापुनर्भरण प्रकल्प
– केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार
– कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतून धाराशिव, बीड जिल्ह्यांतील 133 गावांना सिंचन लाभ
– या प्रकल्पासाठी 11,626 कोटी रुपयांना सुधारित प्रशासकीय मान्यता

हे सुद्धा वाचा

यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘या’ विशेष तरतुदी

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 : ‘या’ आहेत महत्त्वाच्या ठळक बाबी

अवघ्या १ रुपयात पिक विमा, शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला १२ हजार; शिंदे-फडवणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा

सिंचनाचे विविध प्रकल्प पूर्ण करणार
– गेल्या 8 महिन्यात 27 सिंचन प्रकल्पांना सुप्रमा
– चालू 268 पैकी 39 प्रकल्प यावर्षी पूर्ण करणार
– प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील 6 प्रकल्प यावर्षी पूर्ण करणार
– बळीराजा जलसंजीवनी योजनेतील 24 प्रकल्प पूर्ण करणार
– गोसिखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास यावर्षी 1500 कोटी, जून 2024 पर्यंत प्रकल्प पूर्ण करणार
– कोकणच्या सिंचन सुविधांसाठी विशेष कृती कार्यक्रम, खारभूमी बंधार्‍यांच्या कामांना गती

मराठवाडा वॉटरग्रीडचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी
– मराठवाडा वॉटरग्रीडचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेला
– छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यांना जायकवाडी धरणातून पाणी
– बीड, लातूर जिल्ह्यांसाठी जायकवाडी, माजलगाव, उर्ध्वमनार धरणातून पाणी
– धाराशिव जिल्ह्यासाठी उजनी, सीना कोळेगाव, निम्नतेरणा धरणातून धरणातून पाणी

हर घर जल: जनजीवन मिशनसाठी सुमारे 20,000 कोटी रुपये तरतूद
पाण्यासोबत स्वच्छताही!
– जलजीवन मिशन : 17.72 लाख कुटुंबांना नळजोडणी, सुमारे 20,000 कोटी रुपये
– 1656 एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण प्रकल्प
– 10,000 कि.मी.च्या मलजलवाहिनी
– 4.55 कोटी मेट्रीक टन कचर्‍यावर प्रक्रिया
– 22 नागरी संस्थांना 124 यांत्रिक रस्तासफाई वाहने
– ग्रामीण भागात 15,146 घनकचरा, सांडपाणी प्रक्रिया कामे

5000 गावांमध्ये सुरु करणार जलयुक्त शिवार 2.0
– जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा 5000 गावांमध्ये
– गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेस 3 वर्ष मुदतवाढ

5000 गावांमध्ये सुरु करणार जलयुक्त शिवार 2.0
– जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा 5000 गावांमध्ये
– गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेस 3 वर्ष मुदतवाढ

प्रणव ढमाले

Recent Posts

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटी येथे हातगाडीला आग

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटीत (State Bank Chowk Chowpatty) मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हातगाडीला लागलेली आग…

14 mins ago

नाशिक इगतपुरी तालुक्यात बालविवाह रोखण्यात यश

इगतपुरी तालुक्यात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह (child marriage) रोखण्यात बाल आयोगाला यश(Success in…

1 hour ago

मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड मार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात

मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highway) चांदवड मार्गावर भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. अनेक जण…

1 hour ago

उन्हाळ्यात गूळ खाण्याचे फायदे

गुळामध्ये ( jaggery) व्हिटॅमिन बी 12, बी 6, लोह, खनिजे आणि जीवनसत्वे असतात. आपली रोगप्रतिकारक…

2 hours ago

पिंपळगाव येथे महिन्याभरात सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याची उलाढाल ठप्प

एप्रिल महिन्यात पिंपळगाव बाजार समितीत सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याचे (onions) आवक होत असते. महिन्याभरापासून…

2 hours ago

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितेसाठी पोलीस गृहभेटीला

मानवी जीवनाच्या अर्ध्या टप्प्यावर आयुष्याचा लेखाजोखा मांडत असताना प्रेम, आपुलकी, स्नेह, आत्मीयता, आदर व ईश्वर…

2 hours ago