31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराष्ट्रीयभारताला सैनिक आणि शेतकऱ्याचे महत्त्व पटवून देणाऱ्या लाल बहादूर शास्त्री यांची आज...

भारताला सैनिक आणि शेतकऱ्याचे महत्त्व पटवून देणाऱ्या लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती…

देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय राजकारणात मोलाचा वाटा उचलणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा आज जन्मदिवस. स्वतंत्र भारताचे सहावे पंतप्रधान पद भूषवण्याची संधी लाल बहादूर शास्त्री यांना लाभली. आजच्याच दिवशी जन्मलेल्या महात्मा गांधींचा लाल बहादूर शास्त्री यांच्यावर प्रभाव होता. गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत शास्त्री यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला.

लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशमधील मुघलसराई या गावात झाला. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. मात्र शास्त्री केवळ दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लाल बहादूर शास्त्री यांची आई आपल्या तीन मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली. घरी सर्वजण त्यांना ‘नन्हे’ नावाने हाक मारीत.

लालबहादूर यांचे प्राथमिक शिकण प्राथमिक शिक्षण आजोळी झाले. उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षणासाठी त्यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. त्यावेळी देशभरात इंग्रजाविरोधात भारतीयांमध्ये विद्रोहाचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्री यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेण्याचा निर्णय दिवसेंदिवस प्रबळ होत गेला. गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले, त्यावेळी लाल बहादूर शास्त्री सोळा वर्षांचे होते. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्याचे ठरवले.

वाराणसीतील काशी विद्यापीठात लाल बहादूर शास्त्री यांनी प्रवेश घेतला. ब्रिटीश राजवटीच्या विरोधात भारतीय स्वातंत्र्य सैनिक तयार करण्यासाठी या संस्थेची उभारणी करण्यात आली होती. शास्त्री यांच्या कुटुंबियांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते प्रयत्न असफल ठरले. या संस्थेतील अनेक महान विद्वान आणि देशभक्तीचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडला.

हे ही वाचा 

म्हणून २ ऑक्टोबर पासून भारतात स्वच्छ भारत मिशन सुरु झाला…

कोथरुडमध्ये ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह’, आठवडाभर रंगणार गांधींजींच्या विचारांचा जागर!

वाघनखांनी काढला आरोपांचा कोथळा, ‘ती’ वाघनखे शिवरायांची नसल्याचा दावा

मिर्झापूर येथील ललितादेवी यांच्याशी शास्त्री यांचा १९२७ साली विवाह झाला. त्याकाळी हुंड्याची पद्धत दृढ होती. चरखा आणि हाताने विणलेले काही मीटर कापड शास्त्री यांनी हुंडा म्हणून स्विकारले. १९३० साली महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला. या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली. लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढयात त्यांनी स्वत:ला झोकून दिले.

१९४६ साली काँग्रेस सरकार स्थापन झाले. काँग्रेसने शास्त्री यांना उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव पदावर नियुक्त करण्यात आले आणि लवकरच ते गृहमंत्री पदावरही नियुक्त झाले. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे मंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उदयोग मंत्री, गृहमंत्री आणि नेहरुंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. तीसहून अधिक वर्षे आपल्या समर्पित सेवेदरम्यान लाल बहादूर शास्त्री निष्ठा, क्षमतेसाठी जनमानसांत लोकप्रिय झाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी